Thursday, April 18, 2024
घरमानिनीBeautyचमकदार केसांसाठी असा बनवा प्रोटीन हेअर मास्क

चमकदार केसांसाठी असा बनवा प्रोटीन हेअर मास्क

Subscribe

ब्युटी पार्लर किंवा सलोनमध्ये केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटिन्स ट्रीटमेंट उपलब्ध असतात. पण, दर वेळेला या ट्रीटमेंटचा फायदा होईलच असे नाही. अशावेळी तुम्ही केसांचे नुकसान टाळण्यासाठी आणि केस चमकदार बनविण्यासाठी घरच्या घरी तयार केलेले प्रोटीन हेअर पॅक वापरायला हवे. या पॅकसाठी तुम्हाला जास्त खर्च सुद्धा लागणार नाही. अशाने केस मुळांसह मजबूत आणि निरोगी होण्यास मदत होईल.

अंडी-दही हेअर पॅक –

- Advertisement -

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. आपले केस मऊ आणि चमकदार बनण्यासाठी अंडी फायदेशीर ठरतात तर दह्याने स्कॅल्प आणि केस स्वच्छ होतात.

साहित्य –
1 ते 2 अंडी
1 टेबलस्पून दही

- Advertisement -

कृती –

 • एका बाऊलमध्ये अंडी आणि दही गुळगुळीत पेस्ट टायर होईपर्यत फेटून घ्या.
 • केस जास्त कोरडे असल्यास अंड्यातील पिवळे बलक लावा जर केस तेलकट असतील तर अंड्याचा पांढर भाग आणि सामान्य केसांसाठी संपूर्ण अंड तुम्ही लावू शकता.
 • तयार मिश्रण केसांवर 30 मिनिटे लावा.
 • 30 मिनिटानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
 • केस धुण्यासाठी तुम्ही शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करू शकता.

एवाकाडो – नारळाच्या दुधाचा हेअर पॅक

नारळाचे दूध प्रोटिन्सचा उत्तम स्रोत आहे. तर एवाकाडोमध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि ई असते. या पॅकमुळे कोलेजनचे प्रोडक्शन देखील वाढते जे केसांच्या वाढीस मदत करतात.

साहित्य –
एक पिकलेला एवाकडो
2 चमचे नारळाचे दूध
1 टीस्पून ऑलिव्ह ऑइल

कृती-

 • एवाकडो मॅश करून घ्या. आत यात नारळाचे दूध आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करा.
 • तयार मिश्रण स्कॅल्प आणि केसांवर लावा.
 • ३० मिनिटे तसेच राहूद्या.
 • तुमच्या रेगुलर शॅम्पू आणि कंडिशनरने ३० मिनिटानंतर केस स्वच्छ धुवून घ्या.

केळी आणि बदाम हेअर मास्क –

केळी आणि बदाम प्रोटीन्सचे उत्तम स्रोत मानण्यात येतात. केस चमकदार आणि केसांच्या समस्येपासून सुटका होण्यासाठी केळी आणी बदामाचे हेअर मास्क बनवू शकता.

साहित्य –
1 पिकलेले केळ
2 चमचे बदाम

कृती –

 • केळी मॅश करून घ्या
 • आता त्यात बदामाचे तेल मिसळा
 • तयार पेस्ट केसांना लावा.
 • जवळपास 20 मिनिटे तयार पेस्ट केसांना तशी राहूद्या
 • 20 मिनिटानंतर कोमट पाण्याने कस स्वच्छ करा आणि नंतर केसांना सॉफ्ट शॅम्पूने धुवून घ्या.

 

 

 


हेही वाचा : शॅम्पू करण्याआधी आणि नंतर केसांची अशी घ्या काळजी

- Advertisment -

Manini