Tuesday, April 30, 2024
घरमानिनीFashionउन्हाळ्यासाठी असे निवडा कूल सनग्लासेस

उन्हाळ्यासाठी असे निवडा कूल सनग्लासेस

Subscribe

उन्हाळामध्ये उष्णतेचा त्रास हा अधिक जाणवतो. डोक्यावर जाणवणारी प्रचंड उष्णता आपल्या आरोग्यसाठी अनेक पद्धतींनी हानिकारक असते. अशावेळी, स्वतःचा उष्णतेपासून जास्तीत जास्त कसा बचाव करता येईल, हे पाहणं गरजेचे असते. विशेष करून डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे असते कारण उन्हाळ्यात अल्ट्रा व्हायलेन्ट किरणांचा त्रास अधिक होण्याची शक्यता असते.

डोळा हा अत्यंत नाजूक अवयव मानला जातो. डोळा जितका नाजूक आहे तितकाच तो आपल्यासाठी महत्वाचाही आहे. डोळ्यांच्या सुरक्षततेसाठी उन्हाळ्यात सनग्लासेस घालणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय सनग्लासेस निवडताना इतरही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. सनग्लासेस निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आपण जाणून घ्यायला हवे.

- Advertisement -

ग्लासेसची क्वालिटी –
जेव्हा ऐखादी व्यक्ती सनग्लास खरेदी करण्यासाठी दुकानात जाते तेव्हा त्या व्यक्तीचा 90% वेळ त्याच्या चेहऱ्यावर सर्वोत्तम दिसणारी सनग्लासेस निवडण्यात जातो. एखाद्याला फ्रेम आवडल्याबरोबर, क्वचितच कोणी ग्लासेसच्या क्वालिटीकडे पाहते. पण, सनग्लासेस खरेदी करताना त्याची क्वालिटी चेक करणे खूप महत्वाचं असते आणि अनेक जणांकडून आवडीची फ्रेम करण्याच्या नादात तेच राहून जाते. याशिवाय सनग्लासेस अल्ट्राव्हायलेन्ट किरणांना किती प्रमाणात रोखू शकतात हे देखील विचारणे गरजेचे असते.

लेसन्सचे प्रकार माहित असणे गरजेचे –
सनग्लासेसचे अनेक प्रकार असतात. जसे की, इंडेक्स प्लास्टिक, ग्रेडियन्ट टिंट, फोटोक्रोमॅटिक्स आणि पॉली कार्बोनेट. सनग्लासेस खरेदी करण्यापूर्वी ही माहिती आपल्याला माहित असायला हवी. रस्त्यावर विकले जाणारे सनग्लासेस कधीच खरेदी करू नये, कारण त्याची क्वालिटी चांगली नसते शिवाय आपली दृष्टी त्याने धूसर होण्याची शक्यता अधिक असते. अशाने तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते शिवाय रस्त्यावर मिळणाऱ्या फ्रेम्स बहुतेकदा व्यवस्थित बसत नाही.

- Advertisement -

सनग्लासेस कशापासून बनविले जातात ?

सर्व प्रकारच्या लेन्समध्ये काचेची लेन्स सर्वात कठीण आणि मजबूत असते. काचेचा सर्वात दोष म्हणजे त्याचे वजन. जे लोक मोठ्या फ्रेम्स असणारे ग्लासेस वापरतात त्यांची एक तक्रार कायम असते की, नाकाच्या दोन्ही बाजुंना दुखत आहे.

फोटोक्रोमिक लेन्स – फोटोक्रोमिक लेन्स काचेपासून बनविल्या जातात. जेव्हा तुम्ही त्या परिधान करता तेव्हा तेजस्वी सूर्यप्रकाशात त्याच रंग गडद होतो आणी जेव्हा तुम्ही अंधारात किंवा सावलीत येता तेव्हा त्याचा रंग सामान्य होतो.

प्लास्टिक – काचेच्या लेन्सपेक्षा प्लस्टिकच्या लेन्स हलक्या असतात. त्यामुळे आजची पिढी त्यांना अधिक पसंती देते. पण, काचेच्या लेन्सपेक्षा प्लॅस्टिकच्या लेन्सवर लवकरच स्क्रॅचेस येतात.

पॉली कार्बोनेट – हा लेन्स खरं तर पारंपरिक प्लॅस्टिकच्या लेन्सपेक्षा हलक्या आणि न तुटणाऱ्या असतात. हे चष्मे, 16 वर्षाखालील मुलांसाठी आणि खेळामध्ये भाग घेणाऱ्या किंवा धोकादायक उद्योगात काम करणाऱ्या लोकांसाठी शिफारस केले जातात.

सनग्लासेसचे प्रकार –

कॅट-आय फ्रेम – सनग्लासेसचा एक प्रकार म्हणजे कॅट आय फ्रेम. मांजराच्या डोळ्यांसारखे आकार असणारे ही फ्रेम उन्हाळ्यात ट्राय करू शकतात. याने तुमचे डोळे उन्हात पूर्णतः झाकले जातात.

मोठे रेट्रो ग्लासेस – रेट्रो वाइब्सबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला यात आयताकृती आणि गोलाकार असे दोन्ही प्रकार मिळतात. रेट्रो लूक जर आवडत असेल तर तुम्ही हे नक्कीच उन्हात वापरू शकतात.

अरुंद फ्रेम – मोठ्या रेट्रो फ्रेमप्रमाणेच, उन्हाळ्यात अरुंद फ्रेम ग्लासेससुद्धा अनेक जणांची पसंती असते. एक वेगळा हटके लूकसाठी अरुंद फ्रेम तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी.

ट्रान्स्परन्ट फ्रेम – अलीकडच्या काळात सनग्लासेसमध्ये आणखी एक ट्रेंड सुरू आहे तो म्हणजे ट्रान्स्परन्ट फ्रेम. यात तुम्हाला पांढरा आणि पिवळा अशा दोन छटा मिळतात.

लक्षात ठेवा, सनग्लासेसची निवड करताना तो आधी स्वतःवर ट्राय करा. चेहऱ्याप्रमाणे फ्रेम निवडल्यानंतर, कलर लेन्स निवडताना ती योग्य प्रकारेच निवडा.

 


हेही वाचा : 

- Advertisment -

Manini