घरदेश-विदेशElectoral Bonds : काळा पैसा पुन्हा राजकारणात येण्याची भीती; अमित शाह यांची...

Electoral Bonds : काळा पैसा पुन्हा राजकारणात येण्याची भीती; अमित शाह यांची प्रतिक्रिया

Subscribe

नवी दिल्ली : “निवडणूक रोख्यांवर बंदी घातल्यामुळे आता काळा पैसा पुन्हा एकदा राजकारणात आणला जाऊ शकतो”, अशी भीती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांवर बंदी आणल्यानंतर अमित शाह यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे. राजकीय क्षेत्रातून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी निवडणूक रोख्यांची योजना आणली होती, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२४’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

हेही वाचा – Arvind Kejriwal : अखेर केजरीवाल न्यायालयासमोर हजर, जामीन मंजूर

- Advertisement -

न्यायालयाच्या निर्णयाचा आदरच, पण

भाजपाने २०१८ मध्ये निवडणूक रोख्यांची योजना आणली होती, ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच बंदी घातली. भारतीय राजकारणातील काळ्या पैशाचा प्रभाव संपवण्यासाठी निवडणूक रोखे आणण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे. मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो. तरीही असे वाटते की, निवडणूक रोखे पूर्णपणे रद्द करण्याऐवजी त्यात सुधारणा करायला हवी होती, असेही ते म्हणाले. राजकारणातून काळा पैसा हद्दपार करण्यासाठी निवडणूक रोखे योजना कशी आणली गेली, यावर चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. तसेच ही योजना पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्यात काही सुधारणा करण्यात आली असती, असेही ते म्हणाले. निवडणूक रोखे योजना लागू होण्याआधी राजकीय पक्षांना रोख स्वरुपात देणग्या दिल्या जात होत्या. त्याची नावे कधीही उघड झाली नाहीत. मात्र, ही योजना लागू झाल्यानंतर संस्था किंवा वैयक्तिक पातळीवर बँकेच्या माध्यमातून बाँड विकत घेण्याची आणि ते राजकीय पक्षांना देणगीस्वरुपात देण्याची पद्धत अमलात आणण्यात आली. भाजपा सत्तेत असल्यामुळे निवडणूक योजनेचा आम्हाला सर्वाधिक फायदा झाला, असा एक समज आहे. राहुल गांधी यांनी तर या योजनेला जगातील सर्वात मोठा घोटाळा, खंडणी उकळण्याचा मार्ग असे म्हटले आहे. कोण त्यांना ही माहिती देतं, हे माहीत नाही, अशी खोचक टीका देखील अमित शाह यांनी केली.

बाकीचे १४ हजार कोटी कुठे गेले?

- Advertisement -

भाजपाला ६००० कोटींचे निवडणूक रोखे मिळाले आहेत. सर्व राजकीय पक्षांना मिळालेल्या एकूण निवडणूक रोख्यांचा आकडा हा २० हजार कोटींच्या घरात आहे. त्यातून भाजपाला ६ हजार कोटी मिळाले तर उरलेले १४ हजार कोटींचे निवडणूक रोखे गेले कुठे? असा सवालही अमित शाह यांनी उपस्थित केला. तसेच निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपावर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांवरही अमित शाह यांनी टीका केली.

हेही वाचा – Modi Road Show : काय सांगता, पंतप्रधानांच्या रोड शोला पोलिसांचा नकार; न्यायालयाकडून परवानगी

कोणत्या पक्षाला किती रुपये?

यावेळी कोणकोणत्या पक्षाला किती रुपये मिळाले, याचीही आकडेवारी त्यांनी सादर केली. तृणमूल काँग्रेसला १६०० कोटी, काँग्रेस पक्षाला १४०० कोटी, भारत राष्ट्र समितीला १२०० कोटी, बीजेडी ७७५ कोटी आणि तमिळनाडूतील द्रमुक पक्षाला ६४९ कोटींच्या देणग्या मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -