Tuesday, April 9, 2024
घरमानिनीBeautySkin Care : उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी

Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी

Subscribe

उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. कारण या ऋतूमध्ये प्रखर सूर्यप्रकाशाचा तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या सुरू होतात. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची, या संबंधीत महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया.

चेहरा स्वच्छ करणे आवश्यक
उन्हाळ्यात त्वचेवर साचणाऱ्या डस्टमुळे पिंपल्स आणि मुरुमे होतात. बेडशीटवर बसलेली धूळ रात्री चेहऱ्यावर जमते त्यामुळे सकाळी ती साफ करावी. अशा परिस्थितीत चेहरा स्वच्छ ठेवा आणि चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही फेसवॉशचा वापर करू शकता. यासोबतच चेहरा धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.

- Advertisement -

तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करा
उन्हाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझ करणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात बरेच लोक आपल्या त्वचेवर मॉइश्चरायझर वापरत नाहीत आणि त्यामुळे चेहऱ्याचा रंग निखळतो. चेहऱ्यावर चमक कायम ठेवण्यासाठी त्वचेला नक्कीच मॉइश्चरायझ करा.

सनस्क्रीन वापरा
उन्हाळ्यात जेव्हाही तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुमच्या त्वचेला उन्हापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन वापरा . तुम्ही बाहेर कुठेही जात नसलात, तरी एकदा घरी सनस्क्रीन लावा. बाजारात अनेक प्रकारचे सनस्क्रीन उपलब्ध आहेत, परंतु तेच सनस्क्रीन वापरा जे तुमच्या त्वचेचे संरक्षण करतात. सनस्क्रीनसाठी तुम्ही डॉक्टर किंवा तज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता.

- Advertisement -

अति मेक-अप करू नका
अनेक वेळा स्त्रिया हवामान लक्षात न ठेवता समारंभासाठी हेवी मेकअप करतात. उन्हाळ्यात केलेला अति मेक-अप घामामुळे किंवा इतर कारणांमुळे खराब होऊ शकतो.अति मेक-अपचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही होऊ शकतो. त्यामुळए फक्त हलक्या मेकअप टिपचे अनुसरण करा.

त्वचा हायड्रेटेड ठेवा
उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो, ज्यामुळे त्वचा डिहायड्रेट होते. त्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही हायड्रेटिंग फेस मास्कचा वापर करू शकता. त्याचबरोबर त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

- Advertisment -

Manini