Saturday, April 27, 2024
घरमानिनीFashionकमी उंची असूनही साडीत दिसाल स्मार्ट, फॉलो करा या टिप्स

कमी उंची असूनही साडीत दिसाल स्मार्ट, फॉलो करा या टिप्स

Subscribe

साडी हा आपला पारंपारिक पेहराव आहे. यामुळे हा असा एकमेव पेहराव आहे की तो तुम्ही कोणत्याही प्रसंगी वापरू शकता. मग तो ऑफिस लूक असो सणवार,लग्नप्रसंग, पार्टी सभा असो साडी नेसल्यानंतर प्रत्येक महिलेचा लूक बदलतो. त्यातही जर तुम्ही उंच असाल तर साडी तुमच्या सौंदर्याला अजून चार चांद लावते. पण जर तुमची उंचीच कमी असेल आणि तुम्ही कोणतीही साडी नेसत असाल तर त्यामुळे तूमचा लूक बिघडू शकतो. अशावेळी जर ठराविकच फ्रॅबिकच्या आणि डिझाईनच्या साड्या तुम्ही कॅरी केल्यात तर कमी उंची असूनही तुम्ही चारचौघात उठून दिसता. त्यासाठी खाली दिलेल्या टिप्स कामी येतील.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला देखील कमी उंचीच्या समस्येचा सामना करावा लागतो. कारण तिची उंची 5.3 आहे. चित्रपटात तिला प्रसंगानुसार साडी नेसावीच लागते. कारण आलिया साडीमध्ये खूप सुंदर दिसते. जी चित्रपटाची गरज असते. आलियाचे ड्रेस डिझायनर देखील तिच्या उंचीचा , वर्णाचा विचार करूनच तिच्यासाठी साडी डिझाईन करतात. त्यामुळे तीचे सौंदर्य साडीमध्ये अधिकच खुलून दिसते. कोणत्या आहेत या डिझाईनरने सुचवलेल्या टिप्स ते बघूया.

- Advertisement -

बोल्ड आणि मोठ्या प्रिंटपासून दूर रहा

- Advertisement -

ज्यांची उंची कमी आहे त्यांनी बोल्ड आणि मोठ्या प्रिंट असलेल्या साड्या नेसू नयेत. यामुळे तुमची उंची आणखी कमी दिसेल. यामुळे शक्यतो छोट्या प्रिंट्स असलेल्या साड्या नेसाव्यात. किंवा बारीक नक्षीकाम केलेल्या .

 

गडद रंग निवडा

गडद रंगाच्या साड्या प्रत्येकाला शोभून दिसतात. अशा परिस्थितीत आलियासारखी चमकदार रंगाची प्लेन प्रिंटेड साडी उंचीने कमी असलेल्या मुलींना खूप चांगली दिसते. या साड्यांमध्ये तुम्ही उंच असल्याचा आभास होतो., आतापासून अशा साध्या-गडद रंगाच्या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच ठेवा. आलियासारख्या मॅचिंग ब्लाउजसोबत अशा साड्यांमुळे तुमचा लुक अधिक स्टायलिश दिसेल.

हलके फॅब्रिक

ज्या मुलींची उंची कमी आहे त्यांनी फक्त हलक्या फॅब्रिकच्या साड्या वापरा. कॉटन किंवा बनारसी साड्या टाळून त्याऐवजी जॉर्जेट, शिफॉन सारख्या साड्या नेसल्या तर बरे होईल. आलिया भट्ट देखील प्रत्येक इव्हेंटमध्ये अशी साडी नेसलेली दिसते, जी तिच्या लुकमध्ये आकर्षण वाढवते.

 

 

हलक्या शेड्स टाळा
जर तुम्हाला तुमच्या उंचीपेक्षा उंच दिसायचे असेल तर हलक्या शेड्स घालू नका, जरी आजकाल पेस्टल रंग ट्रेंडमध्ये आहेत, अशा रंगांमध्ये तुमची उंची कमी दिसू शकते. त्यामुळे नेव्ही ब्लू, ब्लॅक, गडद लाल अशा शेड्स निवडल्या तर उत्तम.

- Advertisment -

Manini