घरमहाराष्ट्रSangli: धक्कादायक! सांगलीत भानामतीचा प्रकार; स्मशानभूमीत दिसली काळी गाठोडी

Sangli: धक्कादायक! सांगलीत भानामतीचा प्रकार; स्मशानभूमीत दिसली काळी गाठोडी

Subscribe

सांगली: सांगलीतील चिकुर्डे येथील स्मशानभूमीत जादूटोणा आणि भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्मशानभूमीत काळ्या कापडात नारळ, लिंबू, काळ्या बाहुल्या त्यावर मुलींचे फोटो व त्यावर धारदार दाभण खुपसून करणीचा अघोरी प्रकार चिकुर्डे येथे बुधवारी उघडकीस आला. भानामतीच्या या प्रकारामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने याप्रकरणी तपास करून संशयितांवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाईच्या मागणीचे निवेदन कुरळप पोलिसांना देण्यात आले. (Sangli Shocking A form of Bhanamati in Sangli A black lump was seen in the cemetery)

तसंच, बुधवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे, कार्यकर्ते निवृत्त उपप्राचार्य बी.आर. जाधव, निवृत्त प्राचार्य डॉक्टर सुदाम माने, विनोद मोहिते यांनी हा प्रकार काय हे उघडकीस आणल्यावर उपस्थित नागरिकांचे प्रबोधन करून स्मशानभूमीची स्वच्छता केली.

- Advertisement -

गोपनीय तपास करत दोषींवर कारवाई करणार

कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत म्हणाले, या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मुळापर्यंत तपास करू. कोणत्याही मुलींची ओळख जाहीर न करता गोपनीय तपास करून दोषींवर गुन्हे दाखल करून. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस पाटलांच्या समक्ष काळ्या कापडातील लटकत्या बाहुल्या व इतर साहित्य काढलं. आत पाहिल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

कापड सोडल्यावर त्यातून नारळ, त्यावर काळी बाहुली, लिंबू व मुलींचे रंगीत फोटो त्याला टोकदार दाभनातून नारळात खुपसले होते. तर नारळाला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्यात कागदी चिठ्या खुपसल्या होत्या. त्या उघडून पाहिल्यावर कागदावर मुलीचं नाव लिहिलेलं होतं. अशी पाच गाठोडी आहेत. यात पाच वेगवेगळ्या मुलींचे फोटो व नावे आहेत. एका कागदावर एका मुलाचे नाव आहे. हे सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी दोषींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी अंनिसचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी केली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : …ते तुम्हाला उद्धव ठाकरे शिकवतील; स्टार प्रचारकांच्या यादीवरील टीकेवरून सेनेचा पलटवार)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -