Saturday, May 11, 2024
घरमानिनीHealthहिवाळ्यात असतो 'सायलंट हार्ट अटैक'चा धोका, ही आहेत लक्षणे

हिवाळ्यात असतो ‘सायलंट हार्ट अटैक’चा धोका, ही आहेत लक्षणे

Subscribe

थंडीच्या दिवसात आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असत. त्वचेच्या समस्यांसोबत  सायलेंट हार्ट अटॅकचा धोका हिवाळ्यात अनेकदा वाढतो. या दिवसात डायबेटीस आणि हार्टच्या रुग्णांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं असतं . अशा परिस्थितीत नक्की कशी काळजी घेतली पाहिजे आणि त्याची लक्षणे काय पाहुयात ,

What is Silent Heart Attack and Its Risk Factors | Dr. Raghu

- Advertisement -

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय ?

कोणत्याही लक्षणांशिवाय शांतपणे जेव्हा अटॅक येतो तेव्हा त्याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात. याची लक्षणं फार किरकोळ आणि सौम्य असतात त्यामुळे कोणतीही मोठा धोका जाणवत नाही.

- Advertisement -

Heart attack symptoms: Signs include grey pallor | Express.co.uk

सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे – अपचन,चक्कर येणे,झोप न लागणे ,घाम येणे,मळमळ,श्वास घेण्यात अडचण,दीर्घकाळापर्यंत थकवा,पाठीचा किंवा छातीच्या स्नायूंचा ताण जाणवणे 

सायलेंट हार्ट अटॅकची कारणे –

लठ्ठपणा – अति वजनामुळे हृदयावर अनावश्यक ताण येतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.हाई ब्लड प्रेशर – हाई ब्लड प्रेशरदेखील सायलेंट हार्ट अटॅकचे कारण ठरू शकते.

वय – खरं तर, वयानुसार, सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढू लागतो .

धूम्रपान – हल्ली तरुणांमध्ये सिगारेट ओढण्याचे फॅड सुरु झाले आहे . मात्र, ही सवय हार्ट अटॅकला आमंत्रण दिल्यासारखीच आहे. सिगरेटच्या धुरात असलेले विषारी पदार्थ रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवत असतात ज्याने हार्ट अटॅक येऊ शकतो.फॅमिली बॅकग्राउंड – जर तुमच्या फॅमिलीमध्ये हार्टअटॅकचा इतिहास असेल तर तुम्हालाही त्याचा धोका असतो. अश्या वेळी वेळोवेळी चेककप करणे गरजेचे असते. 

हाय कोलेस्टरॉल – कोलेस्टेरॉलची लेवल वाढल्याने सायलेंट हार्ट अटॅकही येऊ शकतो


हेही वाचा ;

- Advertisment -

Manini