Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthकमी वयातच महिलांना येतोय हार्ट अटॅक? काय आहेत कारणे

कमी वयातच महिलांना येतोय हार्ट अटॅक? काय आहेत कारणे

Subscribe

पूर्वीच्या काळात हार्ट अटॅक म्हटले की वृद्धांचा आजार असे म्हटले जायचे, पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. आजकाल तरुणांमध्येही त्यातही महिलांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून तरुणींनाही हार्ट अटॅक येत आहे. महिलांमध्ये आढळणारे इस्ट्रोजेन हार्मोन हार्ट मजबूत ठेवते आणि हार्ट अटॅकपासून संरक्षण करते. अशावेळी कमी वयातच महिलांना येणाऱ्या हार्ट अटॅकमागे नक्की काय कारणे आहेत हे जाणून घ्यायला हवे.

  1. डॉक्टरांच्या मते, धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे तरुणींमध्ये हार्ट अटॅकचा धोका निर्माण झाला आहे. महिला आता केवळ घरापुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत, त्यांच्या करिअरवरही त्या लक्ष देत आहेत. त्यामुळे घरकाम आणि ऑफिसचा स्ट्रेसचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
  2. आजकल महिलाही स्मोकिंग करतात. स्मोकिंगमुळे ट्रायग्लिसराईड वाढते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. यामुळे ब्लड स्टिकी बनते. परिणामी, हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण महिलांमध्ये वाढत आहे.
  3. तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार, महिलांमध्ये इस्ट्रोजेन आढळते, जे सेक्स हार्मोन असते. यामुळे हार्ट सुरक्षित राहण्यास मदत होते. पण, बदलत्या लाईफस्टाईलमध्ये अनेक महिलांना जंक फूडचे व्यसन जडले आहे महिला घडाळ्याच्या काट्यावर धावत आहेत. यामुळे इस्ट्रोजनची पातळी कमी होऊ लागते आणि हार्ट अटॅकसाठी हे जबाबदार असते.
  4. काही प्रकरणांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांमुळे हार्ट अटॅक येतो.
  5. तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, जेव्हा महिलांना हार्ट अटॅक येतो तेव्हा त्यांची लक्षणे सामान्य नसतात. त्यांना कोणत्याही प्रकारच्या छातीत दुखणे जाणवत नाही. लक्षणांमध्ये महिलांना चालण्यास, घाम येण्याचा त्रास जाणवतो. सूज येणे आणि गॅसची समस्या उद्भवते. ज्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्मण होतो आणि धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

खबरदारी अशी घ्या –

- Advertisement -
  • चाळिशीनंतर नियमित हार्ट तपासणी करा. यात ब्लड प्रेशर,शुगर लेव्हल लिपिड प्रोफाइल आदी टेस्ट अवश्य करा.
  • दिवसातून एक तास काढून व्यायाम अवश्य करा. तुम्हाला आवडेल आणि करायला सोपा जाईल असा व्यायाम करा.
  • स्वतःच्या फिटनेसची काळजी घ्या.
  • जंक फूड, कोलेस्ट्रॉल वाढवणारे, डायबेटिक फूड हे पदार्थ खाणे टाळा.
  • ताण, वजन आणि लठ्ठपणा नियंत्रणात ठेवा. हे तिन्ही नियंत्रणात राहिल्यास इतर अनेक आजारांपासूनही तुमचा बचाव होईल.
  • शुगर लेव्हल किंवा बीपी इतर कोणत्याही आजार असल्यास त्याची औषधे वेळेवर घ्या.

 

 

- Advertisement -

हेही वाचा : Women Health : महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते का ?

 

- Advertisment -

Manini