Monday, May 6, 2024
घरमानिनीHealthHealth Tips : पपई आणि डाळिंब एकत्र खाण्याचे फायदे

Health Tips : पपई आणि डाळिंब एकत्र खाण्याचे फायदे

Subscribe

पपई आणि डाळिंब ही दोन्ही फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. डाळिंबात व्हिटॅमिन सीसह अनेक गोष्टी असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. जे अनेक आजार दूर करण्यात मदत करते. पण ही दोन्ही फळं एकत्र खाऊ शकतो का? तर त्याचे उत्तर आहे हो. कारण ही दोन्ही फळं मल्टीव्हिटामिनचं काम करतात.

पपई आणि डाळिंब एकत्र खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांपासूनही ही फळं रक्षण करतात. पपई डाळींब फळ एकत्र खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. ॲनिमियासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फळे खूप फायदेशीर आहेत. याशिवाय ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. तसेच बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणाची समस्या दूर करते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही दोन्ही फळे एकत्र खाल्ल्याने शरीरातील मल्टीविटामिनची कमतरता भरून निघते.

- Advertisement -

पपई आणि डाळिंब ही दोन्ही फळे शरीरात मल्टीविटामिनप्रमाणे काम करतात. पपईमध्ये अ, ब, क जीवनसत्त्वे असतात. डाळिंबात व्हिटॅमिन सी, ई, थायामिन, रिबोफ्लेविन आणि नियासिन भरपूर प्रमाणात असते. पपईमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. एक वाटी पपई डाळिंबात मिसळून खा, शरीरात फायबरची कमतरता भासणार नाही. हे खाल्ल्याने शरीरातील छोट्या-छोट्या आजारांपासून आराम मिळतो.

- Advertisment -

Manini