Sunday, May 12, 2024
घरमानिनीHealthतोंडाची दुर्गंधी सांगेल रक्तातील वाढलेलं साखरेचे प्रमाण! जाणून घ्या

तोंडाची दुर्गंधी सांगेल रक्तातील वाढलेलं साखरेचे प्रमाण! जाणून घ्या

Subscribe

आपण कुठल्या समारंभाला जातो किंवा कार्यक्रमांना जातो त्यावेळी अनेकदा लोकं आपल्याजवळ येण्यास किंवा बोलण्यास तयार नसतात. याचं  प्रमुख कारण तुमच्या तोंडाची दुर्गंधी हे असू शकतं. काही खाल्ल्यामुळे किंवा जेवणानंतर तोंड आतून स्वच्छ न केल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येते. जर एखादी व्यक्ती आपल्याला ती गोष्ट उघडपणे सांगते तर ते आपल्यासाठी फारच लज्जास्पद वाटते. मात्र हीच तोंडातून येणारी दुर्गंधी रक्तातील साखरेचे प्रमाण किती वाढले आहे, हे सांगते कसे ते जाणून घ्या.

शरीराचा वास का येतो?

उच्च रक्तातील साखरेचे एक लक्षण म्हणजे शरीराचा वास आहे. दुर्गंधी. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल तर शरीरातून तीन प्रकारचे वास येतात, असे तज्ज्ञांचे मत असून श्वासाला फळासारखा वास येतो किंवा श्वासाला उलट्या किंवा विष्ठेसारखा वास येतो. कधीकधी श्वासाला अमोनियासारखा वास येतो. जी क्रॉनिक किडनी फेल्युअर असणाऱ्या लोकांमध्ये दिसते.

- Advertisement -

मधुमेह असल्यास, तोंडातून एसीटोनचा वास येईल

डॉक्टरांच्या मते, जेव्हा एखाद्याला मधुमेह असतो तेव्हा त्याच्या श्वासाला एसीटोनसारखा वास येतो. हे रक्तातील कीटोन्सचे प्रमाण वाढल्यामुळे होते. एसीटोनचा वास नेल पॉलिश रिमूव्हरसारखाच असतो. अशा परिस्थितीत जर एखाद्याच्या तोंडातून असा वास येत असेल तर त्याने ताबडतोब साखरेची पातळी तपासली पाहिजे.

डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

तोंडातून वास येत असेल तर सर्वप्रथम तोंडाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. माऊथ फ्रेशनर आणि चांगली टूथपेस्ट वापरून पहा. असे करूनही काही फायदा होत नसेल तर प्रथम दंतवैद्य आणि नंतर वैद्याचा सल्ला घ्या. अशा स्थितीत पूर्ण शरीर तपासणीही करावी.

- Advertisement -

असंतुलित मधुमेहाची लक्षणे

जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होते, तेव्हा व्यक्तीला चिडचिड आणि थकवा जाणवू लागतो.
वजनात अचानक बदल होणे हे देखील याचे एक लक्षण आहे. शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर वजन अचानक कमी किंवा वाढू लागते.
जेव्हा शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते तेव्हा तहान वाढू लागते आणि दिवसभरात अनेक वेळा लघवी करण्याची गरज भासते.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने भूक लागते.
रक्तातील साखर कमी झाल्यामुळे घाम येणे आणि डोकेदुखीचा त्रास होतो.
कमी साखरेमुळे अचानक छातीत दुखणे किंवा जळजळ जाणवू शकते.

उपचार

समस्या वाढण्यापूर्वी योग्य वेळी उपचार घेणे महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. जेव्हा रक्तामध्ये केटोन ऍसिडचे प्रमाण वाढते तेव्हा सामान्य अन्न खाण्याचा सल्ला देण्यात येतो. अशा वेळी शारीरिक हालचालींमुळे रक्तातील साखर वाढते. त्यामुळे यावेळी व्यायाम पूर्णपणे टाळा. योग्य जीवनशैलीच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करा. डॉक्टरांचा सल्ला घेऊन इन्सुलिन घ्या.

आहार

तुम्हाला मधुमेह असेल तर ताजे आणि निरोगी पदार्थ खा. संपूर्ण धान्यासारखे फायबरयुक्त पदार्थ खा. संत्री, काकडी, लिंबू यांसारख्या ताज्या फळांचा आहारात समावेश करून तुमच्या आहारात मधुमेहासाठी अनुकूल पदार्थांचा समावेश करा.

- Advertisment -

Manini