Tuesday, May 14, 2024
घरमानिनीHealthशेंगदाण्याचे असेही फायदे, स्मरणशक्ती वाढेल आणि वजनही होईल कमी

शेंगदाण्याचे असेही फायदे, स्मरणशक्ती वाढेल आणि वजनही होईल कमी

Subscribe

बरीच माणसं टाइमपास म्हणून अनेकदा शेंगदाणे खातात, पण तुम्हाला माहीत आहे का ? शेंगदाणा हा चवीसोबत आरोग्यासाठीही तितकाच चांगलला आहे. यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन-ई, मॅग्नेशियम, फोलेट, कॉपर आणि आर्जिनिन यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. तसेच नियमितपणे आणि मर्यादित प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्याने तुम्ही अनेक आजार टाळू शकता. चला तर मग जाणून घेऊया शेंगदाणे खाण्याचे कोणते फायदे आहेत.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त

जर तुम्ही कोलेस्ट्रॉलचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमच्या आहारात शेंगदाण्यांचा समावेश करू शकता. हे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. याशिवाय, शेंगदाण्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ई चा एक उत्तम स्रोत असतो. ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांशी लढण्यास मदत होते.

- Advertisement -

मेंदूसाठी फायदेशीर

शेंगदाणे खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि मेंदूचे आरोग्य सुधारते. तसेच शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन बी 3 जास्त प्रमाणात असते. जे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. याशिवाय शेंगदाणे डिप्रेशनची लक्षणे कमी करण्यासही मदत करतात. रोजच्या आहारात याचा समावेश केल्याने तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.

- Advertisement -

वजन कमी करण्यासाठी मदत

शेंगदाणे भूक कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे वजन कमी करण्यास देखील याची मदत होते. याव्यतिरिक्त, शेंगदाण्यात भरपूर फायबर असते. जे पोटासाठी देखील फायदेशीर आहे. यासोबतच जर तुम्ही तुम्ही वर्कआऊट करत असाल तर तुमच्या शेकमध्ये किंवा स्मूदीमध्ये शेंगदाण्याचा समावेश करा. विशेष म्हणजे याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांच्यासाठी शेंगदाणे फायदेशीर आहे. शेंगदाण्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले मॅंगनीज, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स यासारखे पोषक घटक शेंगदाण्यात जास्त प्रमाणात आढळतात.

________________________________________________________________________

हेही वाचा :

Monsoon: पावसाळ्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता अशी करा पूर्ण

- Advertisment -

Manini