घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआजपासून श्रावणी नव्हे अधिकमास सोमवार

आजपासून श्रावणी नव्हे अधिकमास सोमवार

Subscribe

नाशिक : यंदा श्रावणात अधिक महिना आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात व आंध्रप्रदेशात वेगळा श्रावण नसल्याने अधिक श्रावणात कोणतेही व्रत करू नये. मंगळागौर, श्रावणी सोमवार व शिवपूजन करू नयेत. महाराष्ट्रात शुद्ध श्रावण महिन्यातील चार सोमवारी शिवपूजन करावे, असे आवाहन पंचागकर्ते मोहन दाते यांनी भाविकांना केले आहे.

पंचांगकर्ते दाते म्हणाले की, यंदा आठ श्रावणी सोमवारी शिवपूजन करायचे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर सोशल मीडियावर चर्चाही सुरू आहे. उत्तर भारतात ३ जुलैची पौर्णिमा झाल्यानंतर ४ जुलैपासून श्रावण सुरू होतो. त्यांचा श्रावण कृष्ण पक्ष असतो तर महाराष्ट्रात आषाढ कृष्ण पक्ष असतो. श्रावणातील सोमवारी शिवपूजनासह इतर व्रत सुरू होतात. यात अधिक महिना व शुक्ल पक्ष आहेे. ज्यांना अधिक मासानिमित्त दानधर्म करायचे असतील त्यांनी ती करावीत. अधिक श्रावण मास १८ जुलै ते १६ ऑगस्ट असून, नेहमीप्रमाणे येणारा श्रावण महिना १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत आहे. या कालावधीतच व्रत, मंगळागौरी, श्रावणी सोमवारी, श्रीकृष्ण जयंती साजरी करावी, असे आवाहनही दाते यांनी केले आहे.

- Advertisement -

अधिकमास १८ तर, श्रावण २४ पासून

श्रावणातील अधिकमास १८ जुलैपासून सुरू होईल आणि १६ ऑगस्ट २०२३ रोजी संपेल. अधिकमास सुरू झाल्यामुळे श्रावण शिवरात्री आणि रक्षाबंधन यात ४६ दिवसांचे अंतर राहणार आहे. श्रावणात अधिक महिना असल्याने ८ श्रावणी सोमवार व ९ मंगळागौरी व्रत येणार आहेत.

दर तिसर्‍या वर्षी अधिक मास

ज्योतिषीय गणनेनुसार सौरवर्ष ३६५ दिवस, ६ तास आणि ११ सेकंदाचे असते. मात्र, चांद्रवर्ष ३५४ दिवस आणि ९ तासांचे असते. अशा स्थितीत, दरवर्षी चांद्र वर्षात सौर वर्षापासून सुमारे ११ दिवसांचा फरक असतो. अशा स्थितीत सौर वर्ष आणि चांद्र वर्षाचा ताळमेळ राखण्यासाठी एका मलमासानंतर दुसरा मलमास ३२ महिने, १६ दिवसांनी पुन्हा येतो. अशाप्रकारे दर तिसर्‍या वर्षी अधिक मास असतो. यंदा मंगळवार, १८ जुलैपासून अधिक मास सुरू होईल आणि १६ ऑगस्ट रोजी संपेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -