इंद्रधनुष्य आहार म्हणजे काय ? Rainbow Diet
या इंद्रधनुष्य आहारात दररोज वेगवेगळ्या रंगांची फळे आणि भाज्या खाल्ल्या जातात. तसेच आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या सूक्ष्म आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी, आपण अशा आहाराचे पालन केले पाहिजे, जे सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पालक, गाजर आणि स्ट्रॉबेरीसारखे रंगीत आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ. अशा रंगीबेरंगी पदार्थांनी युक्त इंद्रधनुष्य आहार घेतल्यास आपले आरोग्य सुधारू शकते.

इंद्रधनुष्य आहारात ‘या’ डाईटचा करा समावेश-
- लाल रंग शरीरात येण्यासाठी टोमॅटो, लाल मिरची, स्ट्रॉबेरी आणि टरबूज यांसारखी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.
- लाल रंगाचे पदार्थ हृदय आणि मूत्रमार्गाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ओळखले जातात.
- केशरी रंगाची फळे म्हणजे संत्री, रताळे आणि जर्दाळू यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा.
- याशिवाय ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे म्हणूनही काम करतात.
- पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करतात आणि अनेक प्रकारचे कर्करोग रोखण्यासाठी देखील फायदेशीर ठरतात.
- पिवळी फळे आणि भाज्यांसाठी अननस, केळी, पिवळी भोपळी मिरची आणि लिंबू यांचा समावेश केला जाऊ शकतो.
- पालक, ब्रोकोली, एवोकॅडो, किवी आणि इतर हिरव्या पालेभाज्या तुमच्या इंद्रधनुष्याच्या आहारात हिरव्या रंगाची भर घालतील.
- हे गर्भवती महिलांसाठी देखील खूप फायदेशीर आहेत, जे जन्माला येणा-या मुलाच्या विकासास मदत करतील.
- निळा आणि जांभळा या दोन रंगांच्या फळे आणि भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.
- याशिवाय, ते रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.
- यासाठी ब्लूबेरी, बेरी, वांगी यासारख्या गोष्टी तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.
- इंद्रधनुष्य आहारातील पांढरा रंग हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी आहे.
- याशिवाय, हे कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी देखील मदत करते.
- पांढऱ्या रंगासाठी फुलकोबी, कांदा, लसूण आणि मशरूम यासारख्या गोष्टी खा. तुम्ही अंडी खात असाल तर त्याचाही समावेश करा.

- रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांमध्ये फायबर जास्त आणि कॅलरीज कमी असतात.
- रंगीबेरंगी आहार शरीराला ऊर्जा देतो, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि आरोग्य समस्या दूर ठेवण्यास मदत होते.
- रंगीबेरंगी फळे आणि भाज्या फायबरने परिपूर्ण असतात.
- फळे आणि भाज्यांमध्ये असलेले फायबर देखील आतड्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
हेही वाचा : womens Health : महिलांच्या आरोग्यासाठी मेथीचे दाणे उत्तम