काळे हरभरे शरीराला पोषक आहेत. तसेच ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी काळ्या हरभऱ्याचे सूप करून पियावे. ज्यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहते. तसेच रक्ताची पातळी देखील नियंत्रणात राहते. काळ्या हरभऱ्याचे सूप बनवण्यासाठी जाणून घ्या साहित्य आणि कृती….
साहित्य
- 1 कप उकडलेला काळा हरभरा
- 2 कप काळे हरभऱ्याचे पाणी
- 1 चमचे चिरलेला लसूण
- 1 आले बारीक चिरलेले
- 1 कप चिरलेल सोयाबीन
- 1 कप चिरलेल गाजर
- 1कप चिरलेला टोमॅटो
- एक चिमूटभर काळी मिरे पावडर
- एक चिमूटभर जिरे पावडर
- एक चिमूटभर लाल तिखट
- चवीनुसार मीठ
- 1 चमचा तेल
कृती
- एका पातेल्यात तेल गरम करा. त्यात लसूण घाला आणि फोडणी द्या.
- आता आले घाला आणि नीट ढवळून काही मिनिटे शिजू द्या.
- आता टोमॅटो व्यतिरिक्त सर्व भाज्या घाला आणि मसाले घालून सतत ढवळून घ्या.
- हे लक्षात ठेवा की, गॅसची आच मध्यम असावी.
- त्यात टोमॅटो घाला, त्यानंतर त्यात काळा हरभरा आणि पाणी घाला आणि 3 ते 4 मिनिटे शिजवा.
- आता सूपवर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
- Advertisement -
_______________________________________________________________________
हेही वाचा : Recipe: घरी बनवा कोरियन मिरचीचे तेल
- Advertisement -
- Advertisement -