घरलाईफस्टाईलBlack Raisins - काळा मनुका खाण्याचे फायदे

Black Raisins – काळा मनुका खाण्याचे फायदे

Subscribe

सुक्या मेव्यात समाविष्ट असलेल्या काळया मनुक्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्चा खजाना असतो. दिसायला लहान असले तरी मनुक्यात अनेक पौष्टीक घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळेच डॉक्टर रात्रभर पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्याचा सल्ला रुग्णांना देतात. पण दिवसाला नेमके किती काळे मनुके खावेत आणि त्याचा आरोग्याला नक्की काय फायदा होणार हे ेदखील समजून घ्यायला हवे.

साधारणपणे, प्रौढांसाठी दररोज 3-4 भिजवलेले मनुके आणि लहान मुलांसाठी 1-2 भिजवलेले मनुके खाणे सुरक्षित मानले जाते. पण जर तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर कोणतीही समस्या यासारखी आरोग्यविषयक समस्या असेल तर तुम्ही सल्ला घ्यावा.

- Advertisement -

रक्तातील साखर नियंत्रण
मनुक्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत करते.

मनुका खाण्याचे फायदे

- Advertisement -

ऍसिडिटी कमी करते
काळ्या मनुक्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटी-ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधरण्यास मदत होते. तसेच काळ्या मनुक्यामुळे ॲसिडिटीची समस्याही कमी होते. मनुका थंड पदार्थ श्रेणी गटात मोडतो असे मानले जाते, जे पचनासाठी चांगले आहे.

कोरडा खोकला

काळ्या मनुका कोरड्या खोकल्यावरही गुणकारी आहे.  यासाठी काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी चावून खावेत.

दृष्टी

मनुकामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी विशेषतः फायदेशीर मानले जाते आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते.

दात आणि हिरड्या
काळ्या मनुक्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे निरोगी दात आणि हिरड्या राखण्यास मदत करतात. त्यामुळे त्यांच्या सेवनाने हिरड्यांशी संबंधित समस्याही कमी होतात. त्यात कॅल्शियम देखील आढळते, जे दात मजबूत करते.

दुर्गंधी दूर करा
काळ्या मनुक्यात म अँटी-ऑक्सिडेंट असतात, त्यामुळे श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत होते. मनुका चघळल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.

कॅन्सर प्रतिबंध
काळ्या मनुक्यात व्हिटॅमिन सी आणि इतर अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात. यामुळे फ्री रॅडिकलचे नुकसान कमी होते आणि कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
मनुकामध्ये पोटॅशियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट असतात, जे हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात. यामध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते. हे रक्त परिसंचरण सुधारण्यास देखील मदत करते, जे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -