Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenRecipe : उपवासाची रताळ्याची भाजी

Recipe : उपवासाची रताळ्याची भाजी

Subscribe

नवरात्रीत बऱ्याच जणांचे उपवास असतात. या उपवास काही पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला आराम मिळतो. तसेच भूक सुद्धा भागते. रताळ्याची भाजी उपवासाला खाल्ली जाते. रताळ्यामधे अनेक पोषक तत्वे देखील असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत. जाणून घेऊया उपवासाची रताळ्याची भाजी सोप्या पद्धतीत कशी बनवायची..

साहित्य

  • 3-4 रताळे
  • 3 चमचे तूप
  • 2 लहान चमचे जिरं
  • 4-5 कढीपत्ता
  • मीठ (चवीनुसार)
  • साखर (हवी असेल तर)

Sweet Potato Chaat | Shakarkandi Chaat » Dassana's Veg Recipes

कृती

  • सर्वप्रथम रताळे चांगले धुवून घ्या.
  • धुतल्यानंतर रताळे नीट उकडून घ्या. जास्त उकडू नका. (कारण याचे नीट काप पडत नाही)
  • रताळे उकडून झाल्यावर याचे काप पाडा.
  • आता एक पॅन घ्या. यामध्ये तूप घाला.
  • तूप गरम झाल्यावर यात जिरं आणि कढीपत्ता घाला.
  • यामध्ये आता चवीनुसार मीठ घाला.
  • हे झाल्यावर रताळ्याचे काप यामध्ये मिक्स करा.
  • रताळे टाकून झाल्यावर हवी असल्यास त्यात सखर टाका.
  • हे करत असताना रताळे छान भाजून घ्या.
  • आता तयार आहे गरमा गरम रताळ्याची भाजी.

हेही वाचा : Recipe : उपवासाचा साबुदाणा चिवडा

- Advertisment -

Manini