Tuesday, May 14, 2024
घरमानिनीRecipeहेल्दी मटार इडली

हेल्दी मटार इडली

Subscribe

नाश्त्यामध्ये नेहमीचेच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हिरव्या वाटाण्याची म्हणजेच मटारची ईडली नक्की ट्राय करा. चवीला अप्रतिम आणि आरोग्यासाठी उत्तम अशी ही ईडली आहे.

साहीत्य

- Advertisement -

दीड कप रवा
१ कप उकडलेले हिरवे वाटाणे
1 कांदा (चिरलेला)
आल्याचा १ मोठा तुकडा (किसलेला)
2 चमचे हिरवी धणे (चिरलेली)
३ हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ
एक चिमूटभर बेकिंग सोडा
अर्धा कप दही
1 टीस्पून तेल

कृती-

- Advertisement -

अर्धी वाटी पाणी आणि दही रव्यात मिसळून फेटून घ्या.
झाकण ठेवून 30 मिनिटे बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करून त्यात आले, कांदा, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर टाका.
नंतर कढईत मटार घालून मंद आचेवर ३-४ मिनिटे परतून घ्या.
थंड झाल्यावर मिक्सरमद्ये बारीक वाटून घ्या.
हे मिश्रण रव्यात मिसळा आणि फेटून घ्या.
अर्धा कप पाणी, मीठ आणि बेकिंग सोडा एकत्र करून घट्ट द्रावण तयार करा.
ग्रीस केलेल्या इडलीच्या साच्यात पिठ घाला आणि वाफेवर १५ मिनिटे शिजवा.
नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

- Advertisment -

Manini