Wednesday, May 8, 2024
घरमानिनीHealthवजन कमी करायचे ? मग या भाज्या ठरतील उपयोगी

वजन कमी करायचे ? मग या भाज्या ठरतील उपयोगी

Subscribe

बदलत्या ऋतूनुसार आहारात बदल करणे गरजेचे असते. कारण येणारी हंगामी फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश केल्याने शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत मिळते. पण हिवाळ्यात येणाऱ्या अशा काही भाज्या आहेत ज्या खाल्याने तुम्हाला वजन कमी करता येते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

हिवाळ्यात वजन कमी करणे तसे अवघड असते पण तुम्ही योग्य आहार घेतलात तर ते सहज शक्य होते. आज आपण अशाच काही हंगामी भाज्या पाहणार आहोत ज्या खाऊन तुम्ही थंडीच्या दिवसातही वजन कमी करू शकाल. त्यामुळे गुणयुक्त अशा या भाज्या तुम्ही अवश्य खायला हव्यात.

- Advertisement -

How to Lose Weight and Keep It Off - HelpGuide.org

पालक
हिवाळ्यात पालकाचा आपल्या आहारात अवश्य समावेश करावा. पालकात भरपूर प्रमाणात लोह असते. ज्यांना अशक्तपणाचा त्रास आहे त्यांनी तर पालक अवश्य खावे. पालकाच्या सेवनाने अशक्तपणा दूर होतो आणि एनर्जी लेव्हल सुधारते. व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी’ ने परिपूर्ण असलेले पालक खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीरात जमा झालेले अतिरिक्त फॅट्स काढून टाकण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी पालक फायदेशीर आहे.

- Advertisement -

कांद्याची पात
हिवाळा सुरु झाला की, मार्केटमध्ये कांदयाची पात मोठ्या प्रमाणावर येऊ लागते. कांद्याच्या पातित अँटी-ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती सुधारते. शिवाय हृदयाच्या आरोग्यसाठी फायदेशीर असणारे सल्फर कंपाउंड्स कांद्याच्या पातित असतात. कांद्यच्या पातित लठ्ठपणा विरोधी गुणधर्म असतात. जे वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात.

पुदीना
पुदिना शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी पुदिना खूप उपयोगी आहे. हे पचनास मदत करते.

मटार
प्रोटीनयुक्त मटार हिवाळ्यात बाजारात येऊ लागतात. हे स्नायूंच्या वाढीसाठी अत्यंत गुणकारी आहेत. हिरव्या वाटण्यात फायबर, व्हिटॅमिन ‘बी’ आणि ‘के’ भरपूर प्रमाणात असते. मटार ही खूप कमी कॅलरीजची भाजी आहे. याच्या सेवनाने कॅलरीज कमी होतात पण पोट भरलेले राहते. त्यामुळे याने वजन कमी करण्यास मदत मिळते.

 


हेही वाचा ; जेवणाच्या ताटात कोणते पदार्थ किती प्रमाणात असावेत, जाणून घ्या

- Advertisment -

Manini