घरमनोरंजनहुबेहुब सुशांतचा व्हिडीओ बघून फॅन्स हैराण

हुबेहुब सुशांतचा व्हिडीओ बघून फॅन्स हैराण

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता जवळपास तीन वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले असले तरी सुशांतचे चाहते अजूनही या घटनेला विसरलेले नाहीत. 14 जून 2020 रोजी सुशांतने वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. आजही त्याचे लाखो चाहते त्याची आठवण काढतात. सोशल मीडियावर सतत त्यांच्या आठवणींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती हुबेहुब सुशांतसारखा दिसत आहे. या व्यक्तीकडे पाहून तो सुशांत आहे असं कोणालाही वाटेल.

सुशांतसारखा दिसणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by donim_aYAAn1513 (@donim.ayaan1513)

सुशांत सिंह राजपूतसारखा दिसणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील तो तरुण हुबेहुब सुशांतसारखा दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने पहिल्यांदा लाल रंगाचा शर्ट परिधान केला असून त्यानंतर तो लगेच काळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसतो. यामध्ये त्याचा चेहरा, हेअरस्टाईल सर्व काही सुशांत सारखंच दिसत आहे.

- Advertisement -

व्हिडीओतील व्यक्तीवर चाहते भडकले

अनेकजण या व्यक्तीला पाहून सुशांतच्या आठवणीत भावूक झाले. पण त्यानंतर अनेकांनी हा व्हिडीओ AI च्या मदतीने बनवला असल्याच सांगितलं. त्यामुळे अनेकांनी व्हिडीओतील व्यक्तीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एकाने लिहिलंय की, “लाईक्स आणि कमेंट्ससाठी लोक काहीही करायला लागले आहेत, हे सर्व थांबवा.”


हेही वाचा : तुमच्या जिवलग मित्राशी लग्न… दीपिकाने शेअर केली रणवीरसाठी खास पोस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -