मुंबईत संत्र्यांच्या ट्रकमधून Meth आणि कोकेनची तस्करी; 1476 कोटींचा साठा जप्त

meth and cocaine worth 1476 crore seized in truck carrying imported oranges in mumbai

मुंबई : मुंबईत आयात केलेल्या संत्र्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून मेथ (Meth) आणि कोकेन या अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. डीआरआयने या ट्रकमधून 1476 कोटींचा मेथामफेटामाइन आणि कोकेनचा साठा जप्त केला आहे. एजन्सीच्या माहितीनुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईतील वाशी येथे हा ड्रग्स वाहतूक करणारा ट्रक अडवला. यावेळी अधिकार्‍यांना 198 किलो उच्च शुद्धतेचे क्रिस्टल मेथामफेटामाइन आणि 9 किलो कोकेन व्हॅलेन्सिया संत्र्यांच्या बॉक्समध्ये लपवल्याचे आढळले. याप्रकरणी एजन्सीने माल आयात करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

व्हॅलेन्सिया संत्री घेऊन जाणाऱ्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात हे ड्रग्स लपवण्यात आले होते. हा ड्रग्सचा माल आयात करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे डीआरआयने एका निवेदनात म्हटले आहे. संबंधीत ट्रक संत्र्यांचा माल भरून वाशी येथील प्रभु हिरा आईस अँड कोल्ड स्टोरेजमधून निघाला होता. दक्षिण आफ्रिकेतून हा माल मुंबईत आणण्यात आला होता. सीमाशुल्क विभागातून या संत्र्यांना मंजुरी मिळाल्यानंतर वाशी येथील शीतागृहामध्ये हा माल ठेवला गेला होता. ज्यात मोठ्याप्रमाणात ड्रग्सचाही साठा होता.

अंमली पदार्थ विरोधी एजन्सी एनसीबीने शुक्रवारी मुंबईत “ब्लॅक कोकेन” देशात आणण्याचा प्रयत्न हाणून पाडला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई शाखेने 26 सप्टेंबर रोजी विमानतळावर एका परदेशी नागरिकाकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 13 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले. कोकेनचा हा प्रकार भारतात पहिल्यांदाच आढळला होता, जो स्कॅनिंगदरम्यान स्निफर कुत्रे देखील ते शोधू शकत नाहीत.


आजपासून टॅक्सी-रिक्षाचा प्रवास महागला, जाणून घ्या नव्या किमती