Wednesday, May 15, 2024
घरमानिनीRecipeFood Tips : पराठे लाटताना फाटतात, मग वापरा 'या' टिप्स

Food Tips : पराठे लाटताना फाटतात, मग वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

सध्याच्या काळात स्टफ पराठा हा खवैय्यांमध्ये विशेष लोकप्रिय पदार्थ ठरत आहे. त्यामुळे अनेक जण घरीच पनीर पराठा, मिक्स व्हेज पराठा असेअनेक स्टफ पराठा ट्राय करायचा प्रयत्न करतात. मात्र, बऱ्याचदा हे पराठे लाटत असताना मध्येच फुटतात व त्यातून सगळं सारणं बाहेर येतं. त्यामुळे असे पराठे लाटताना व भाजताना दोन्ही वेळा अडचण निर्माण होते. म्हणूनच, स्टफ पराठा लाटताना तो फुटू नये म्हणून काय करावं ते पाहुयात.

Cabbage Stuffed Paratha Recipe by Ambika Gujar - NDTV Food

- Advertisement -

पराठे लाटताना ‘या’ टिप्स करा फॉलो

1. पीठ भिजवताना

- Advertisement -

पराठ्यासाठी पीठ मळत असताना कणिक घट्ट भिजवली जाईल याकडे लक्ष द्या. जर कणिक सैल झाली तर पराठा लवकर फुटू शकतो. तसंच पराठा लाटण्यापूर्वी स्टफ केल्यावर प्रथम तो हातावर थोडासा थापून घ्यावा व त्यानंतर लाटण्यास सुरुवात करावी. यावेळी पराठ्याच्या कडा थोड्या जाडसर ठेवाव्यात. विशेष म्हणजे पराठ्याच्या पीठात मीठ किंचितसं जास्त घालावं व स्टफिंगमध्ये मीठ कमी घालावं. स्टफिंगमध्ये मीठ जास्त झाल्यामुळे मिश्रण ओलसर होण्याची शक्यता अधिक असते. ज्यामुळेदेखील पराठा फुटू शकतो.

2. मैद्याचा वापर 

पराठ्याचं पीठ मळताना व पराठा लाटताना मैद्याचा वापर करावा. मैद्याचा पराठा पटकन फुटूत नाही. त्यामुळे कणकेच्या पीठात थोडासा मैदा टाकावा.

3. सारण बनवताना

पराठ्यांचे सारण हे सगळ्यात जास्त महत्वाचे असते. तुम्ही कोणतेही पराठ्यासाठीचे सारण बनवा. त्यामध्ये जर कांदा किंवा भाजी चिरुन घातलेल्या असतील तर त्या भाज्या अगदी बारीक चिरुन घ्या. त्यामुळे त्या लाटताना मध्ये मध्ये येत नाही.  विशेषत: कांदा. कांदा बारीक चिरला नसेल तर तो कांदा सतत मध्येमध्ये येत राहतो. त्यामुळेही पराठा फाटत राहतो. पराठा फाटला की, मग तो तव्याला चिकटणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे तुम्ही सारण बनवताना ते चांगले बारीक आहे की नाही हे तपासा.

4. पराठा लाटताना 

अनेक जणी पराठा स्टफ केल्यावर लगेच लाटायला सुरुवात करतात. मात्र, तसं केल्यामुळे पराठ्याच्या कडा तुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच पराठ प्रथम हातावर थापून घ्यावा. त्यानंतर लाटण्यास सुरुवात करावी.

5. असा शेका पराठा

पराठा शेकण्याची पद्धत ही जाणून घेणे गरजेचे आहे. पराठा मध्यम आचेवर भाजला की, तो चांगला आतून शेकला जातो. आधी पराठा एका बाजूने थोडासा शेका. त्यानंतर दुसऱ्या बाजूला पूर्ण शेका. त्यामुळे त्यातील सारण घट्ट होते आणि पराठे फुलायला देखील मदत मिळते. त्यामुळे पराठा शेकण्याची ही पद्धत देखील जाणून घ्यायला हवी.


हेही वाचा :

पावसाळ्यात कुकीज कुरकुरीत राहण्यासाठी खास टीप्स

 

- Advertisment -

Manini