घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसाहेबांनी जुन्नर सुचवले होते मी मात्र येवला निवडले

साहेबांनी जुन्नर सुचवले होते मी मात्र येवला निवडले

Subscribe

नाशिक। येवला येथील जाहीर सभेत बोलतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेची माफी मागतांना येवल्यात आपला अंदाज चुकल्याचे सांगत भुजबळांवर नाव न घेता टिका केली. मात्र पवार साहेबांनी आपल्याला जुन्नर मतदारसंघातून लढण्यास सांगितले असतांना मी येवल्याची निवड केल्याचे सांगत भुजबळांनी पवारांच्या
आरोपांना उत्तर दिले.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच छगन भुजबळ यांचे शनिवारी नाशिकमध्ये आगमन झाले. पाथर्डी फाटा येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भुजबळ फार्म येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना भुजबळ म्हणाले, मंत्रीपद माझयासाठी नविन नाही. १९९१ साली मी महसूलमंत्री होतो तेव्हापासून आजपर्यंत अनेकदा मंत्री झालो त्यामुळे त्याचे अप्रुप नाही. आज नाशिकला येत असतांन मुंबईपासून ठाणे, कल्याण, भिवंडी, इगतपुरी, नाशिक येथे हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्रित येत माझे स्वागत केले यावरूनच माझा निर्णय योग्य असल्याचे या स्वागतातून दिसून आल्याचे ते म्हणाले. आपला निर्णय चुकल्याचा आरोप पवार यांनी येवल्यातील सभेत केला. याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले, कदाचित पवार साहेबांना विस्मरण झाले असावे. त्यावेळी जळगाव जिल्हयातील एरंडोल, वैजापूर, जून्नरमधून मला निवडणुक लढण्यासाठी आग्रह होता. जुन्नर हे माझ्या वडीलांचे गाव. भायखळा मार्केटमध्ये आमचा भाजीपाल्याचा व्यवसाय. गेली ४० वर्ष मी या मार्केटचा अध्यक्ष आहे. येथील सर्व लोक हे जुन्नरमधील आहेत त्यामुळे जुन्नर हा माझ्यासाठी सेफ मतदारसंघ होता. पुणे जिल्हयात हा मतदारसंघ असल्याने पवार साहेबांनीही मला जुन्नर मतदारसंघातून लढण्याचे सूचवले. पंरतू येवल्यातील काही सरपंच, स्थानिक नेते माझ्याकडे आले आणि त्यांनी येवल्याच्या विकासासाठी मला गळ घातली. यापुर्वी मी शिवसेना, काँग्रेसमध्ये असतांना हेलिकॉप्टरने येवल्यात यायचो. तेव्हा मी विचार केला. जुन्नर माझ्यासाठी सेफ आहे परंतू येवल्यात काम करायला संधी आहे त्यामुळे मी येवल्याची निवड केली. येवलेकरांनी मला भरभरून आर्शिवाद दिले. एकदा नव्हे चार वेळा मला निवडून दिले. जोपर्यंत येवल्याच्या जनतेचा आर्शिवाद आहे तोपर्यंत मी राहील असे ते म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्रीपदाची ऑफर सोडली

पवार साहेब, तारीक अन्वर, पीए संगमा यांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले. तेव्हा मी काँग्रेसचा विरोधीपक्ष नेता होतो. त्यावेळी माझ्याच बंगल्यावर बैठक झाली व नवीन पक्ष स्थापनेचा निर्णय घेतला. याच बैठकीत पक्षाचे चिन्ह, ध्वज ठरविण्यात आला. त्यावेळी मुकुल वासनिक, सुरेश कलमाडी, माधवराव शिंदे, पायलट, सोनिया गांधीचे सहकारी जॉर्ज आणखी काहींनी तुम्हाला मुख्यमंत्री करतो तुम्ही जाऊ नका म्हणून मला गळ घातली तरीही मी मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारत पवार साहेबांना साथ दिल्याचे त्यांनी सांगितले.

आज देणार प्रत्युत्तर

येवल्यात झालेल्या जाहीर सभेत पवारांनी भुजबळांचे नाव न घेता समाचार घेतला. यावेळी सुप्रिया सुळे यांनीही आरोप केले. याबाबत विचारले असता येवल्यात साहेब जे काही बोलले किंवा आणखी कोणी काही बोलले असतील त्याबाबत रविवारी सकाळी साडेदहा वाजता खुलासा करेल असे सांगत अधिक बोलणे टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -