Thursday, May 16, 2024
घरमानिनीRecipeMukhwas Recipe : घरच्या घरी झटपट बनवा मुखवास

Mukhwas Recipe : घरच्या घरी झटपट बनवा मुखवास

Subscribe

बडीशेप म्हंटल की,सगळेजण आवर्जून खातात. अशातच जेवण झाल्यानंतर मुखवास हा दिलाच जातो. विशेष म्हणजे या मुखवासातही विविध प्रकार असल्याचं पाहायला मिळतं. बडीशेप खाल्ल्यामुळे त्वचेसंबंधीत असलेल्या तक्रारी दूर होतात. चेहऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या असतील तर बडीशेपचं नियमित सेवन केल्यास या तक्रारी दूर होतील.रक्तशुद्धी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे बडीशेप. ॲसिडीटी, अपचन असा त्रास होत असल्यास विड्याचं पान खायला द्यावं. पचनशक्ती सुधारण्यासाठी विड्याचं पान खूपच उपयुक्त ठरतं.

बडीशेपमध्ये विशिष्ट प्रकारचे तैलीय घटक असता. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. आजच्या लेखात आपण खायला पौष्टिक आणि चवीला चवदार असा मुखवास घरच्या घरी कसा तयार करायचा याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

- Advertisement -

साहित्य

  • एक पाव बडीशोप
  • अर्धा वाटी ओवा
  • अर्धा वाटी पांढरे तीळ
  • अर्धा वाटी धना डाळ
  • अर्धा वाटी जवस
  • 2 ते 3 लिंबू
  • मीठ
  • हळद

Multi Seed Mouth Freshener & Digestive Aid (Mukhwas) | Mouth freshener,  Ayurvedic recipes, Digestion aid

कृती 

  • सर्वप्रथम बडीशोप,ओवा, जवस, तीळ लिंबू, मीठ आणि हळद घालून ते व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
  • नंतर हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवावे.
  • 15 मिनिटा नंतर लोखंडी कढई तापत ठेवावी आणि सुरूवातीला मंद आचेवर धना डाळ भाजुन घ्यावी.
  • यानंतर धना दाळीला बदामी रंग आला की ताटात काढून घ्यावी.
  • नंतर मग कढईमध्ये तीळ, ओवा, जवस घालून मंद आचेवर कोरडे होई पर्यंत भाजून घ्या. व नंतर ताटात काढून घ्या.
  • सगळ्यात शेवटी बडीशोप कढई मध्ये घालून घ्यावी. व ती मंद आचेवर कोरडी होई पर्यंत भाजून घ्यावी.
  • आता ताटात सगळे जिन्नस गार झाले की ते मिक्स करावे व नंतर एका कोरड्या बरणीत भरून ठेवा.
  • बरणी शक्यतो हवा बंद हवी, म्हणजे मुखवास, मुखशुद्धी कुरकुरीत रहाते.

हेही वाचा :

Nachni Biscuit : अशा पद्धतीने तयार करा पौष्टिक नाचणी बिस्कीट

- Advertisment -

Manini