Saturday, September 30, 2023
घर मानिनी Kitchen Nachni Biscuit : अशा पद्धतीने तयार करा पौष्टिक नाचणी बिस्कीट

Nachni Biscuit : अशा पद्धतीने तयार करा पौष्टिक नाचणी बिस्कीट

Subscribe

नाचणीचा वापर आपण रोजच्या आहारात फार कमी प्रमाणात करतो. परंतु नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे 3-4 दिवसातून एकदा तरी नाचणी युक्त पदार्थांचे सेवन करायला हवे. आज आम्ही तुम्हा नाचणीचे बिस्कीट कसे तयार करावे हे सांगणार आहोत.

साहित्य :

 • 4 वाटी नाचणी पीठ
 • 2 वाटी पिठी साखर
 • 2 वाटी तूप
 • 1 छोटा चमचा बेकिंग पावडर
 • मीठ चवीनुसार
- Advertisement -

कृती :

Ragi Cookies Recipe Sharmis Passions | Ragi Biscuit | vartec.gr

- Advertisement -

 

 

 • सर्वप्रथम नाचणी पीठ आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या.
 • त्यामध्ये तूप टाकून मिश्रण चांगले एकजीव करा.
 • नंतर त्यामध्ये पिठी साखर टाकून तसेच थोडे दूध टाकून घट्ट असा गोळा बनवून घ्या
 • आता तो गोळा 30 मिनिटे तसाच झाकून ठेवा.
 • त्यानंतर जाडसर लाटून वाटीच्या साहय्याने त्याचे काप पाडा.
 • आता त्याला ओव्हनमध्ये 180 डि.सें. वर 20 मिनिटे बेक करा.

हेही वाचा :

Recipe : सोप्या पद्धतीने तयार करा, नाचणी आप्पे

- Advertisment -

Manini