घरमहाराष्ट्रबाळासाहेबांचे विचार भरभक्कम धरणासारखे, केसरकरांचे उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

बाळासाहेबांचे विचार भरभक्कम धरणासारखे, केसरकरांचे उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

Subscribe

बाळासाहेबांनी संपूर्ण देशाला एक मार्गदर्शन केले आहे. या मार्गापासून तुम्ही वेगळेहून मुख्यमंत्री झालात. त्याचप्रमाणे आता त्यांची पंतप्रधान व्हायची इच्छा असेल, असा टोलाही दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

मुंबई | मातीच्या धरणाला खेकडे फोडू शकतात. भरभक्कम धरणाला नाही, असा टोला शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनीठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची ‘आवाज कुणाचा’ पॉडकास्टमध्ये मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग आज सकाळी प्रसारित करण्यात आला. उर्वरित दुसरा भाग हा उद्या 27 जुलै 2023 रोजी सकाळी 8 वाजता प्रसारित होणार आहे.

दीपक केसरकर म्हणाले, “या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी स्वत: धरण म्हटले. धरण हे अभ्यद्य असते असून मातीच्या धरणाला खेकडे पोखरू शकतात. बाळासाहेबांचे विचार हे भरभक्कम धरणासारखे आहेत. ते कधीही फुटू  शकत नाही. बाळासाहेबांनी संपूर्ण देशाला एक मार्गदर्शन केले असून तुम्ही या मार्गापासून तुम्ही वेगळेहून मुख्यमंत्री झालात. त्याचप्रमाणे आता त्यांची पंतप्रधान व्हायची इच्छा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.”

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्याबदल बोलताना आम्ही नेहमी आदराने बोलतो, तर त्यांनी सुद्धा आमच्याबद्दल आदराने बोलावे, असा सल्ला केसरकरांनी दिला. तसेच प्रत्येक जण समय पाळतात असे नाही. जर एखाद्याने चुकीचे काही बोलले, तर उद्धव ठाकरेंच्या मनाला लागण्याची शक्यता असते, असा टोलाही त्यांनी लगावला. “वेगवेळ्या विचार सरणीचे लोक एकत्र येऊन लढा उभा राहू शकत नाही. लढा हा देशाच्या हिसाठी असू शकतो. आज देशाचे हित फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करतात. ही वस्तू स्थिती आहे”, असेही केसरकरांनी आवर्जून सांगतिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -