Wednesday, May 15, 2024
घरमानिनीRecipeSankashti Chaturthi Recipe : वालाचं बिरडं...

Sankashti Chaturthi Recipe : वालाचं बिरडं…

Subscribe

हिंदू पंचांगांनुसार, कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असते. साधारणपणे वर्षामध्ये १२ संकष्टी चतुर्थी असतात. तसेच अधिकमास असल्यावर ही संख्या १३ वरही जाते. तसेच या उपवासाच्या दिवशी काही विशिष्ट पदार्थ खाल्ले जातात. या पदार्थांमध्ये वालाच्या बिरड्याचा समावेश असतो. तर आज आपण खमंग वालाच्या बिरड्याची सोपी रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया वालाचं बिरडं कसं करायचं…

साहित्य 

  • मोड आलेले वाल – 150 ग्रॅम कांदा (बारीक चिरुन घेतलेला)
  • टोमॅटो – 1 कप (बारीक चिरुन घेतलेला)
  • आल लसुण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • हळद – 1/4 टेबलस्पून
  • लाल तिखट मसाला – 2 टेबलस्पून
  • गरम मसाला – 1 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कांदा खोबऱ्याचे वाटण – 1 कप
  • कोथिंबीर – (बारीक चिरलेली)
  • तेल – 2 ते 3 टेबलस्पून

बिरडे रेसिपीस - 34 रेसिपीस - Cookpad

कृती 

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा.
  • कांदा सोनेरी रंगांचा झाल्यावर त्यात आल लसणाची पेस्ट घालावी.
  • त्यानंतर फोडणीत बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला घालावा.
  • आता या तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये मोड आलेले वाल घालून घ्यावेत. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे.
  • वाल घातल्यानंतर या भांड्यावर झाकण ठेवून वाल हलकेच शिजवून घ्यावेत.
  • 3 ते 4 मिनिटे असेच शिजवून एक उकळी काढून घ्यावी.
  • आता यात गरजेनुसार त्यात पाणी घालावे. त्यानंतर वाल हातांनी दाबून व्यवस्थित शिजले आहेत की नाहीत याची नीट खात्री करुन घ्यावी.
  • वाल शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी यात कांदा खोबऱ्याचे वाटण घालावे.
  • सगळ्यात शेवटी या तयार झालेल्या वालाच्या बिरड्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवुन घ्यावी.

हेही वाचा : हिवाळ्यात हे 2 लाडू खा, अशक्तपणा होईल दूर…

- Advertisment -

Manini