घरगणेशोत्सव 2022महाराष्ट्राची प्रगतीच्या दिशेची वाटचाल गतिमान होवू दे; अजित पवारांचे गणरायाकडे साकडं

महाराष्ट्राची प्रगतीच्या दिशेची वाटचाल गतिमान होवू दे; अजित पवारांचे गणरायाकडे साकडं

Subscribe

मुंबईसह राज्यभरात उद्यापासून म्हणजेच बुधवार 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. राज्यभरातील घराघरांत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत गणरायाचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. उद्याच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय नेत्यांनी शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे

मुंबईसह राज्यभरात उद्यापासून म्हणजेच बुधवार 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. राज्यभरातील घराघरांत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत गणरायाचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. उद्याच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय नेत्यांनी शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. काही तासांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी ‘लाडक्या गणरायाचं स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प पूर्णत्वास जावा यासाठी गणरायाला साकडं घालतो’, असे म्हणत शुभेच्छा दिल्या. (Let Maharashtra move towards progress opposition party leader Ajit Pawar prayer to Ganesha)

“गणरायाच्या कृपाशिर्वादाने कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेला महाराष्ट्र आणि देश संपूर्ण कोरोनामुक्त होऊ दे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पांच्या आगमनासोबत घराघरात आनंद, उत्साह, चैतन्य, भक्तीचे वातावरण येवू दे. शेतकऱ्यांच्या शिवारात पिकांची, घरात धनधान्याची समृद्धी येवू दे. राज्यात सर्वांना सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य लाभू दे. प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राची सर्वांगिण प्रगतीच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल गणरायाच्या आशिर्वादाने अधिक गतिमान होवू दे”, अशी प्रार्थना करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गणरायाला भक्तीपूर्ण वंदन केले असून सर्व गणेशभक्त, राज्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

“दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा साजरा होत असलेला गणेशोत्सव सर्वांनी कुटुंब, मित्र, नातेवाईक, एकमेकांच्या सोबतीने आनंदाच्या, उत्साहाच्या, भक्तीमय वातावरणात, शिस्त व नियमांचे पालन करुन साजरा करुया”, असे आवाहनही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.


हेही वाचा – धक्कादायक! शहापुरात ७०० पेक्षा अधिक बालके कुपोषित, ८५ बालके मृत्यूशय्येवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -