Saturday, May 4, 2024
घरमानिनीKitchenसुके खोबरे वर्षभरासाठी असे करा Store

सुके खोबरे वर्षभरासाठी असे करा Store

Subscribe

मांसाहार असो वा शाकाहार असो, या दोन्ही जेवणात सुक्या खोबऱ्याचा सरास वापर केला जातो. यासाठी गृहिणी घरात वर्षभरासाठी सुके खोबरे साठवून ठेवतात. पण, सुके खोबरे काही दिवसानंतर खराब होते. खोबरे साठवून ठेवल्यानंतर ते खवट आणि काळे पडू लागते. यामुळे खोबऱ्याची चव देखील बदलते. तेव्हा तुम्ही हे खोबरे जेवणात वापरू शकत नाही. मग, खोबरे वर्षभरासाठी कसे साठवूण ठेवावे, यासंदर्भात काही टीप्स सांगणार आहोत.

 

- Advertisement -

‘या’ आहेत टीप्स

  • खोबरे एका पिशवीमध्ये बाधून हवा बंद डब्यात ठेवा आणि यात पाणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • खोबरे एका कागदावर पसरवून ठेवा.
  • खोबरे खराब होऊ नये म्हणून एका वाटीत पाणी आणि मीठ एकत्र करा
  • एक कापडा घेऊन ते मीठाच्या पाण्यात बुडवा आणि यानंतर खोबऱ्याची वाटी तुम्ही आतून बाहेरुन पुसून घ्यावी. यानंतर खोबरे सुकवून घ्या.
  • खोबऱ्याच्या आतील बाजूला खोबरेल तेल लावा.
  • खोबरेल तेल लावल्यानंतर खोबऱ्याच्या वाट्या कडक उन्हात दोन दिवस वाळवून घ्या. यानंतर हवांबद डब्यात ठेवा

- Advertisement -

‘हे’ आहे सुक्या खोबऱ्याचे फायदे

  • सुके खोबरे हे हृदय आणि मेंदूसाठी खूप चांगले असते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
  • सुके खोबऱ्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो.
  • सुके खोबरे खालल्याने संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांचा धोका कमी होतो
  • सुक्या खोबऱ्यात लोहचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता होऊ देत नाही
  • सुके खोबरे खालल्याने स्मरणशक्ती वाढते.

हेही वाचा – फ्रिजमध्ये ठेवलेली भेंडी लगेच सुकते, मग या टीप्स येतील कामी

 

- Advertisment -

Manini