Monday, May 6, 2024
घरमानिनीKitchenRecipe : चटकदार बटाट्याची रस्सा भाजी

Recipe : चटकदार बटाट्याची रस्सा भाजी

Subscribe

बटाटा हा सर्वच जेवणात अगदी सर्रासपणे वापराला जातो. झटपट होणारी बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. जाणून घ्या साहित्य आणि कृती….

साहित्य

  • 2 कच्चे बटाटे
  • 2 कच्चे टॉमेटो
  • चिरलेला कांदा
  • 4-5 पाकळ्या ठेचलेली लसूण
  • आल्याचे तुकडे बारीक केलेले (प्रमानुसार)
  • तेल
  • चवीनुसार मीठ (प्रमानुसार)
  • गूळ
  • हिंग
  • गोडा मसाला
  • कढीपत्ता
  • हळद
  • तिखट
  • जिरे
  • मोहरी

बटाट्याची पातळ रस्सा भाजी | Maharashtrian Potato Curry | Batata Recipe ...

कृती

  • सर्वात प्रथम बटाटे आणि टॉमेटोचे मोठे तुकडे करून घ्यावेत आणि ते पाण्यात ठेवावे.
  • नंतर लहान कुकरमध्ये तेल घ्यावे.
  • तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग, कडिपत्त्याची तीन चार पाने घालून परतावे.
  • यानंतर यामध्ये चिरलेला कांदा, बटाटे आणि टॉमेटोचे तुकडे घालून मिक्स करावे.
  • हे झाल्यावर त्यात हळद, तिखट, गूळ, गोडा मसाला, मीठ घालावे आणि मिक्स करून वरून अंदाजानुसार जाड रस्सा होईल इतके पाणी ओतावे.
  • तसेच हे पाणी व्यवस्थित ढवळून घ्यावे जेणेकरून मसाल्याच्या गुठळ्या राहणार नाहीत.
  • त्यानंतर कुकरचे झाकण लावा आणि साधारण तीन शिट्ट्या द्या.
  • तुमची बटाट्याची पातळ रस्सा भाजी तयार.

हेही वाचा :  Recipe: जेवणाच्या पंगतीला वाढला जाणारा मसाले भात

- Advertisment -

Manini