Sunday, September 24, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Kitchen Recipe: जेवणाच्या पंगतीला वाढला जाणारा मसाले भात

Recipe: जेवणाच्या पंगतीला वाढला जाणारा मसाले भात

Subscribe

आपण जेव्हा एखाद्या जेवणाच्या पंगतीला बसतो तेव्हा तेथे मसाले भात आवर्जुन वाढला जातो. खरंतर घरी बनवला जाणारा मसाले भात हा पंगतीतील भातासारखा होत नाही. अशातच घरी हा मसाले भात कसा बनवायचा याची रेसिपी आपण आज पाहणार आहोत.

Masale Bhat recipe in Marathi| मसाले भात - Kali Mirch - by Smita

- Advertisement -

साहित्य-

250 ग्रॅम बासमती तांदूळ
50 ग्रॅम तोंडली
50 ग्रॅम वांगी
50 ग्रॅम मटार
2 छोटे बटाटे
1 मोठा कांदा बारीक चिरून
1 चमचा लाल तिखट मसाला
1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जीरे
1 चमचा गरम मसाला
थोडे काजू तळून
थोडी कोथिंबीर व ओले खोबरे
चवीनुसार मीठ

- Advertisement -

घर के बनाये easy and simple 48 मसाले भात रेसिपीज . मसाले भात recipes in  hindi - Cookpad

कृती-
प्रथम 250 ग्रॅम तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुऊन घेतले. आणि त्यात पाणी घालून भिजत ठेवा. आता तोंडली, वांगी, मटार, बटाटे याचे चार तुकडे करून स्वच्छ धुवून त्यात टाका. असे केल्यानंतर मटार, वांगी, तोंडली, बटाटे, काजू हे तुपाल हलके तळून घ्या.

आता त्याच कढईत 2 मोठे चमचे तूप घालून, ते चांगले गरम होऊ द्या. त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जीरे घालून ते चांगले तडतडल्यावर, त्यात 1 मोठा कांदा बारीक चिरलेला तो चांगला परतून घ्या. पुढे त्यात 1 मोठा चमचा लाल तिखट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्यावर धुवून घेतलेले तांदूळ घालून तो चांगला परतून घ्या.

नंतर त्यात तळून घेतलेलया भाज्या, तळलेले काजू घालून त्यात 3 पेले पाणी घालून, भात चांगला परतून घेतल्यानंतर. कढईवर झाकण ठेवून 1 वाफ काढा. गॅस बंद करून, त्यावर मीठ, ओले खोबरे व तळलेले काजू घाला. अशा प्रकारे तयार होईल तुमचा मसाले भात.


हेही वाचा- Recipe: झटपट होणारा निलंगा राईस

- Advertisment -

Manini