Thursday, May 2, 2024
घरमानिनीRelationshipवैवाहीक जीवन आनंदी ठेवण्यासाठी वापरा money management habbits

वैवाहीक जीवन आनंदी ठेवण्यासाठी वापरा money management habbits

Subscribe

सुखी संपन्न वैवाहीक आयुष्यासाठी जसा योग्य पार्टनर मिळणे गरजेचे असते तसेच वैवाहीक आय़ुष्यात आनंदी राहण्यासाठी योग्य आर्थिक नियोजनही तेवढेच महत्वाचे असते. यासाठी सुरुवातीपासूनच दांपत्यांनी एकमेकांना विचारात घेऊन भविष्यासाठी आर्थिक योजना आखल्या पाहीजेत. त्यासाठी काही सवयी दोघांनी स्वत:ला लावून घ्यायला हव्यात.

त्यातच जर पैशांच्या बाबतीत दोघांचे विचार भिन्न असतील तर त्याचा परिणाम नातेसंबंधांवर होतो. यामुळे पैशांचे व्यवहार आणि नातेसंबंध यात समन्वय सांभाळणे आवश्यक असते.

- Advertisement -

स्वार्थीपणा

- Advertisement -

संसार हा दोघांचा असतो. यामुळे जर दोघांपैकी एक पार्टनर जर पैशांच्या बाबतीत स्वार्थीपणा करत असेल तर दुसऱ्याने सावध होणे गरजेचे आहे. जर मी कमावतो किंवा कमावते यामुळे माझ्या पैशांचा वापर हा फक्त माझ्यासाठीच करणार अशी वर्तणूक जर पार्टनरची असेल तर सगळंच कठीण होऊन जातं. जेव्हा पार्टनर पैशांच्या बाबतीत कुटुंबापेक्षा स्वत:चाच जास्त विचार करतो तेव्हा नाते अडचणीत येत आहे हे ओळखावे.

काय कराल ?
जर तुम्हांला नात्याबरोबरच घऱाचे आर्थिक नियोजनही सुरळीत ठेवायचे असेल तर जबाबदाऱ्या वाटून घ्या. यात घरातील कामांबरोबरच आर्थिक नियोजनांचाही समावेश करा. त्यानंतर मात्र उरलेले पैसे स्वत:वर खर्च करा.

वायफळ खर्च टाळा

एखादी गोष्ट आवडली म्हणून ती विकत घेण्यापेक्षा त्याची किती गरज आहे याला विचार करा. त्यामुळे वायफळ खर्चावर आपोआपच नियंत्रण बसेल.

उधारीपासून लांब राहा
एखाद्याकडून एकदा पैसे उधार घेतले की बऱ्याचजणांना ती सवयच जडते. मग अशावेळी आपल्या जोडीदाराला न सांगताही कधी मित्र, मैत्रिणीकडून तर कधी नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले जातात. यामुळे असे व्यवहार करणे तात्काळ थांबवावे.

 

- Advertisment -

Manini