घरक्रीडाWTC Final: रवींद्र जाडेजाने घेतली ग्रीनची फिरकी, त्रिफळा उडवल्याचा Video व्हायरल

WTC Final: रवींद्र जाडेजाने घेतली ग्रीनची फिरकी, त्रिफळा उडवल्याचा Video व्हायरल

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. परंतु ऑस्ट्रेलियाचं आव्हान पेलत फक्त २९६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाची सुरूवात अत्यंत खराब पद्धतीने सुरु होती. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या चांगल्या फलंदाजांची ऑस्ट्रेलियाने विकेट पाडली. परंतु अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावत आणि उत्कृष्ट खेळी करत संघाला सावरण्याच्या प्रयत्न केला. परंतु या सामन्याचा आज चौथा दिवस असून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर भारतीय गोलंदाजांनी चांगलाच भेदक मारा केला आहे. यावेळी अष्टपैलू रवींद्र जाडेजाने ग्रीनचा घेतलेल्या विकेटचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कॅमेरॉन ग्रीन आणि अलेक्स कॅरी ही जोडी संयमी खेळी करत होती. अलेक्स कॅरी शक्य त्या पद्धतीने धावा जमवत होता. पण ग्रीनला मात्र धावा काढता येत नव्हत्या. अशातच रवींद्र जाडेजाने लक्ष केंद्रीत करत गोलंदाजी करताना ग्रीनची फिरकी घेतली आणि त्याचा त्रिफळा उडवला. चेंडू पायाच्या मागे टप्पा पडून नजरेच्या रेषेबाहेरून आत येत होता. त्यामुळे ग्रीनला खेळताना त्रास झाला. ग्रीनने चेंडू सोडला पण तो चेंडू त्याच्या हँडग्लोव्ह्जला लागला आणि स्टंम्पवर आदळला. या फिरकीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

- Advertisement -

स्मिथकडून कसोटी कारकिर्दीतील ३१वे शतक पूर्ण

याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ३२७ धावांवर आपल्या ३ विकेट्स गमावल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड (१४६) आणि स्टीव्ह स्मिथ (९५) यांनी चांगली खेळी केली. दुसऱ्या दिवशी हेड आणि स्मिथ यांच्यात २५१ धावांची नाबाद भागीदारी झाली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात स्मिथने कसोटी कारकिर्दीतील ३१वे शतक पूर्ण केले. त्याचवेळी हेडने १५० धावा पूर्ण केल्या.

- Advertisement -

भारतीय संघ ऑल आऊट

भारताकडून रहाणे आणि शार्दुल ठाकूरने १०० अधिक धावांची चांगली भागीदारी करत भारताला फॉलोऑनपासून वाचवले आणि भारताची धावसंख्या २७०वर नेऊन ठेवली. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर ठाकूरने संघाचा मोर्चा सांभाळत अर्धशतक झळकावले तर नंतर शमी आणि उमेश यादवने संघाची धावसंख्या वाढवण्यात हातभार लावला. अशारितीने टीम इंडिया २९६ धावांवर ऑलआऊट झाली.


हेही वाचा : WTC FINAL 2023 : भारतीय फलंदाजांची खराब सुरुवात; 151 धावांवर गमावल्या 5


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -