Friday, May 17, 2024
घरमानिनीRelationshipपार्टनर खोटं बोलतोय कसं ओळखाल?

पार्टनर खोटं बोलतोय कसं ओळखाल?

Subscribe

खोटं बोलणे आणि खोटं बोललेले पकडणे या दोन्ही कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीला जर व्यवस्थितीत खोटं बोलता येत नसेल तर त्याच्यासाठी असे करणे फार मुश्किलीचे काम असते. ते खोटं बोलत आहेत हे पटकन कळून येते. अशातच तुमचा पार्टनर सुद्धा तुमच्याशी खोटं बोलत असेल तर नक्की कसं ओळखायचे याच बद्दलच्या काही ट्रिक आपण पाहणार आहोत.

चेहरा पांढरा पडणे –
समोरचा व्यक्ती जर खोटं बोलतोय की खरं याची साक्ष चेहराच देतो. अनेकदा खोटं बोलताना चेहरा पांढरा पडतो. याशिवाय चेहऱ्यावर अपराधीपणाची भावनाही दिसू लागते.

- Advertisement -

Relationship-how-to-catch-partner-lie

आवाज बदलणे –
एवढ्या व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतीत जर अचानक बदल होत असेल तर तेही खोटेपणाचे लक्षण आहे. अशा तऱ्हेने आवाज डळमळीत होऊ लागतो आणि समोरची व्यक्ती काहीतरी लपवत आहे हे सहज पकडता येते.

- Advertisement -

डोळे मिचकावणे –
आपला चेहरा खूप काही सांगून जातो. जेव्हा कोणी खोटं बोलतो, तेव्हा तो व्यक्ती डोळे सतत मिचकावतो. आपल्या सहज लक्षात येते की, तो व्यक्ती आपल्यापासून काहीतरी लपवत आहे.

ओठ चघळणे –
खोटं बोलणारा व्यक्ती सतत ओठ चघळत असतो म्हणजेच त्याच्या ओठांची हालचाल दिसून येते. इथे तुम्ही त्याचा खोटेपणा सहज पकडू शकता.

 

 


हेही वाचा ; रिलेशनशिपमध्ये इमोशनल मॅच्युरिटी महत्वाची

- Advertisment -

Manini