Tuesday, April 30, 2024
घरमानिनीRelationshipजोडप्यांमध्ये 'या' क्षुल्लक कारणांवरून होतात भांडणे

जोडप्यांमध्ये ‘या’ क्षुल्लक कारणांवरून होतात भांडणे

Subscribe

जगात असे क्वचितच जोडपे असेल की, जे भांडत नाहीत. प्रेम म्हटले की, रुसवे फुगवे हे आलेच. अनेक कपल्समध्ये छोट्या- मोठ्या गोष्टींवरून भांडणे ही होतच असतात. लहान-सहान भांडणे किंवा नाराजी म्हणजे नात्याचा अंत नव्हे. त्याऐवजी समंजस्याने भांडण सोडवणे आणि एकमेकांना आधार देणे हे केव्हाव्ही चांगले असते. अनेकदा जोडप्यांमध्ये होणारी भांडणे ही खूपच छोट्या गोष्टींवरून किंवा कारणावरून होतात.

‘या’ क्षुल्लक कारणांवरून होतात भांडणे –

- Advertisement -

घरातील कामे कोण करणार-
अनेक जोडप्यांमध्ये घरातील कामे कोण करणार यावरून भांडण होतात. अशावेळी घरातील जबाबदाऱ्या वाटून घेतल्यास तणाव कमी होऊ शकतो. दोघांनी मिळून कामे केल्यास एकमेकांसाठी वेळही काढता येतो.

सुट्टी कुठे घालवायची-
अनेकदा दोघांमध्ये सुट्टी कुठे घालावयाची यावरून वाद होतात. बहुतेक पुरुषांना सुट्टी त्यांच्या गावी, पालकांच्या घरी, नातेवाईकांच्या घरी घालवयाची असते तर महिलांना सुट्टीत काहीतरी नवीन करायचे असते.

- Advertisement -

मुलांचा गृहपाठ कोण घेणार –
पाल्य हे दोघांचे असते त्यामुळे दोघांनी मिळून त्याची कामे करणे स्वाभाविक आहे. पण, कित्येक घरात हे होत नाही. बहुतेकदा स्त्रियाच ही कामे करतात. त्यांच्या शाळेच्या तयारीपासून ते जेवणापर्यत. अशावेळी केवळ एकटीने मुलांची जबाबदारी घेणे हे वादाचे कारण बनते.

कुटूंबापेक्षा ऑफिसच्या कामाकडे जास्त लक्ष देणे –
कोणत्याही नात्यात एकमेकांना वेळ देणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही दोघेही काम करता तेव्हा एकेमकांसाठी वेळ काढणे कठीण होते. तर अनेकजण ऑफिसच्या कामात इतके गुंतून जातात की, घराकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे काम आणि कुटुंब यात समतोल राखणे गरजेचे आहे कारण काम आणि कुटुंब दोन्ही महत्वाचे आहे.

जास्त प्रमाणात फोन वापरणे –
तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या या जगात फोनने आपल्या कुटुंबाची आणि प्रियकराची जागा घेतली आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तुम्ही दोघेही सोबत असताना फोन वापरणे हे अनेक घरात वादाचे कारण बनते.

पैसे जास्त खर्च झाल्यास –
जोडप्यांमध्ये प्रामुख्याने खर्चावरून भांडण होते. जर एक पार्टनरने आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला तर तो दुसऱ्याला व्यर्थ वाटतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, एका पार्टनरला खरेदी करायची असते, मुलांना महागड्या शाळेत टाकायचे असते. तर दुसऱ्याला पैसे वाचवायचे असतात. या गोष्टींवरूनही जोडप्यांमध्ये अनेकदा भांडण होतात.

झोपेत घोरणे –
काही लोकांना झोपेत घोरण्याची सवय असते. अशावेळी पार्टनरला याचा त्रास होऊ शकतो आणि परिणामी जोडप्यामध्ये भांडण होतात.

कोणतीच गोष्ट ऐकून न घेणे –
अनेकदा असे होते की, एखादा व्यक्ती आपले म्हणणे नॉनस्टॉप सांगत असतो आणि समोरची व्यक्ती अजिबात ऐकत नाही किंवा एखाद्या कामामध्ये व्यस्त असते. या कारणावरूनही जोडप्यांमध्ये अनेकदा भांडण होतात.

 


हेही वाचा ; हनिमूनवरून आल्यानंतर कपल्सनी करावे ‘हे’ काम

 

- Advertisment -

Manini