Friday, May 17, 2024
घरमानिनीRelationshipरिलेशनशिपमध्ये इमोशनल मॅच्युरिटी महत्वाची

रिलेशनशिपमध्ये इमोशनल मॅच्युरिटी महत्वाची

Subscribe

रिलेशनशिप मग ते कुठेलेही असो त्यात जर इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे मानसिक प्रगल्भता नसेल तर ते नाते फार काळ टिकत नाही.यामुळे नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी दोघांमध्ये इमोशनल मॅच्युरिटी असणे गरजेचे असते. पण जर एक पार्टनर सातत्याने बालिश पणे वागत असेल तर दुसरा कधीतरी वैतागणारच.अशावेळी नातं कसं सुधरवता येईल याचा दोघांनी विचार करायला हवा.

कोणतेही नाते मजबूत करणे सोपे नसते. विशेषत: तुम्ही निवडलेले नाते अतूट ठेवण्यासाठी वेळ आणि इच्छाशक्ती लागते. पण कधी कधी बालिश कृतींमुळे नाती कमकुवत होतात तुटतात.

- Advertisement -

तज्ज्ञांच्या मते, तुमच्या जोडीदाराप्रती जबाबदार असणं, सहानुभूती दाखवणं, चुका माफ करणं आणि उदार असणं हे नात्यातील परिपक्वता दाखवते. त्यामुळे अशी जोडपी एकमेकांना सपोर्ट करायला नेहमी तयार असतात.

इमोशनल मॅच्युरिटी असलेल्या व्यक्तीला नात्याचं महत्व कळतं. त्यामुळे आहे तसं नातं , परिस्थिती स्वीकारणे आणि पुढे जाण्याकडे अशा व्यक्तीचे प्राधान्य असते. अशी व्यक्ती सकारात्मक विचाराने पुढे जाते आणि नातं घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करते.

- Advertisement -

जर जोडीदार भावनिकदृष्ट्या प्रगल्भ असेल तर तो चांगल्या किंवा वाईट कृती आणि वर्तनाची जबाबदारी घेतो. माफी मागू शकतो.
अशावेळी त्याला माफ करून नात्यामधला गुंता सोडवण्याची एक संधी नक्की देता येईल.

 

- Advertisment -

Manini