Friday, May 10, 2024
घरमानिनीRelationshipतरुणांमध्ये का वाढतोय प्री-मॅरिज कौन्सलिंगचा ट्रेंड?

तरुणांमध्ये का वाढतोय प्री-मॅरिज कौन्सलिंगचा ट्रेंड?

Subscribe

लग्नानंतर पतिपत्नींमध्ये वाद होणे हे साहजिक आहे. जास्त प्रमाणात वाद सुरु राहिल्यास कुटुंबीय यात सहभागी होतात. शेवटी उपाय न निघाल्यास कौन्सिलिंगचा पर्याय निवडण्यात येतो. कौन्सिलिंगकडे जाऊन समस्येचे निवारण करण्यात येते. पण सध्या अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात लग्ना आधीच कौन्सिलिंग करण्यात येत आहे. एक प्रकारे प्री-मॅरिज कौन्सलिंगचा ट्रेंडच सुरु झाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही . ज्यात कपल्स हे लग्नानंतर नाही तर लग्नाआधीच कौन्सिलिंग करत आहेत. ज्याला प्री- मॅरिज कौन्सिलिंग असे म्हटले जाते.

Pre Marriage Counseling

- Advertisement -

प्री- मॅरिज कौन्सलिंग म्हणजे काय?
या कौन्सलिंगमध्ये दोन व्यक्तींचे स्वभाव समजून घेऊन त्यानुसार त्यांना लग्नाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून अधिक चांगला समन्वय साधता येईल. लग्नाशी संबंधित अनेक समस्या असतात. ज्या लग्नानंतर हळूहळू जाणवू लागतात. त्यामुळे त्यांची लग्नाआधी माहिती घेतल्यास भविष्यात ते कठीण जाणार जात नाही. प्री- मॅरिज कौन्सिलिंगमध्ये मुलामुलींचा बायोडेटा जुळविण्याबरोबरच लग्नापूर्वी त्याचे कौन्सिलिंग केले जाते. प्रकरण अधिक कठीण झाल्यास संबंधित व्यवस्थापक दोन्ही पक्षांमध्ये मिटिंग घेण्यात येते. या मीटिंगमध्ये मुलगा आणि मुलगी यांना कोणत्याही प्रकारची अडचण जाणवल्यास दोघेही एकत्र बसून त्याचे विचार लक्षात घेत त्यावर कौन्सिलिंग करण्यात येते.

प्री-मॅरिज कौन्सिलिंग का महत्वाचे आहे?
सध्याच्या परिस्थितीत बिघडत चाललेल्या नात्यांमुळे लग्नाचा निर्णय घेताना अनेक लोक हे गोंधळून गेल्याचे आपण पाहिलं असेल. त्यामुळेच सध्या प्री-मॅरिज कौन्सिलिंगची मदत घेण्यात येत आहे. अशी अनेक कपल्स आहेत जी लग्नानंतर येणारे आव्हाने जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी सल्लागाराचा सल्ला घेत आहेत. कुटुंब आणि नातेवाईकांच्या सल्ल्यापेक्षा लोक कौन्सिलिंगचा सल्ला घेणे अधिक पसंत करत आहेत. केवळ अरेंज मॅरिजचंच नाही तर लव मॅरेज करणारे कपल्स सुद्धा हल्ली प्री-मॅरिज कौन्सिलींगचा पर्याय निवडत आहेत. भविष्यात उद्भवणारे अनेक प्रश्न, शंका या कपल्सच्या मनात असतात. त्या सोडविण्यासाठी काउंसिलिंग करण्यात येते. तसेच काही प्रकरणांमध्ये, एकमेकांच्या स्वभावाबद्दल तक्रारी किंवा कुटुंबाशी संबंधित समस्या असल्याने त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सुद्धा सल्ला घेतला जात आहे.

- Advertisement -

 

 


हेही वाचा;  ‘या’ 4 सवयींमुळे वैवाहिक जीवन राहते आनंदी

- Advertisment -

Manini