Thursday, April 25, 2024
घरमानिनीRelationshipकुटुंबीय लग्नसाठी दबाव टाकताहेत? असा काढा मार्ग

कुटुंबीय लग्नसाठी दबाव टाकताहेत? असा काढा मार्ग

Subscribe

आजकाल 25 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीवर लग्न करण्याच्या दबाव असतो. आई- वडील, नातेवाईक आणि शेजारी हे प्रश्न विचारण्याची एक संधी सोडत नाही. तुमच्या मुलाचे अथवा मुलीचे लग्न कधी होणार आहे? जणू हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे असे ते वागू लागतात. कधी कधी दडपण सहन करणं इतकं अवघड होऊन जात की, त्याचा सर्वाधिक परिणाम करिअर आणि कामावर होतो.

लग्न करण्याच्या दबावाचे वाईट परिणाम

- Advertisement -

नवीन नात्यात येण्याच्या आनंद नाहीसा होतो –
लग्नाचा सततचा दबाव एखाद्या व्यक्तीच्या नात्यातला आनंद कायमचा नष्ट करू शकतो. हा पोकळपणा आयुष्याला नकारात्मक दिशेने नेण्याचे काम करतो. कुटुंबातील सदस्यांनी दबाव टाकण्यापूर्वी, या प्रकरणातील व्यक्तीचे मत जाणून घेतले पाहिजे.

चिंता आणि नैराश्य –
सोशल मीडियावर प्रत्येक जण लग्न करताना पाहून विचार येणे हे स्वाभाविक आहे. कदाचित आपण आयुष्यात मागे राहिले आहोत किंवा माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे हा विचार तुमच्या मनात दीर्घकाळ ठेवल्याने तुम्ही नैराश्यात जाऊ शकतात आणि लोकांपासून दूर होऊ शकता.

- Advertisement -

कमी आत्मसन्मान –
समजा तुम्ही एका मित्राच्या लग्नाला गेलात, तिथे सर्व मित्र त्यांच्या जोडीदाराला घेऊन आलेले आहेत हे पाहिल्यानंतर तुम्हालाही असे वाटू शकते की, आपला पार्टनर सोबत नाही यासह जेव्हा पालक किंवा कुटुंबातील कोणीतरी असा दबाव निर्माण करतात आणि चार गोष्टी सांगतात तेव्हा ते कमी आत्मसन्मामचे कारण बनू शकते.

आयुष्याशी खेळणे –
पालकांनी या मुद्यावर जरूर विचार केला पाहिजे की मुलांनी किंवा मुलीने दबावाखाली लग्न केले तरी तो पार्टनरला आनंदी ठेवेल याची काय श्वाश्वती? तुम्ही समोरच्या व्यक्तीची स्वप्ने आणि इच्छा मारत नाही का हेही पालकांनी आणि कुटुंबीयांनी जाणून घेणे गरजेचे आहे.

लग्न करण्यासाठी होणारा दबाव हाताळण्याचे मार्ग

मोकळेपणाने व्यक्त व्हा –

या परिस्थितीला सामोरे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपले विचार कुटुंबातील सदस्यांसमोर उघडपणे मांडणे, केवळ मुद्दा मांडू नका तर करिअरला तुमचे प्राधान्य आहे हे पटवून द्या.

स्वतःला योग्यरीत्या जाणून घ्या –

स्वतःशी बोला आणि विचारा की, तुम्हाला आयुष्यभर लग्न करायचे नाही की, तुम्हाला थोडा वेळ अजून हवा आहे तुम्हाला जे काही उत्तर मिळेल ते तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा.

घाई करू नका –

कितीही दबाव आला तरी घाईत निर्णय घेऊ नका. तुम्हला हव्या असलेल्या जोडीदाराविषयी देखील कुटूंबीयांशी नक्कीच शेअर करा.

आत्मविश्वास बाळगा –

जर तुम्हालाही लोकांना पाहून लग्न करण्याचा विचार येत असेल तर, कोणते कारण तुम्हाला थांबत आहे ते पहा जाणून घेण्याचा प्रयन्त करा. तुम्ही जो काही निर्णय घ्यायला त्यावर विश्वास ठेवा.

 

 


हेही वाचा : नवरा-बायकोमधील किरकोळ वाद महत्वाचे का?

 

- Advertisment -

Manini