#WorldNoTobaccoDay: धुम्रपान करणाऱ्या ६० टक्के लोकांना ‘सीओपीडी’चा त्रास

#WorldNoTobaccoDay: धुम्रपान करणाऱ्या ६० टक्के लोकांना ‘सीओपीडी’चा त्रास

धुम्रपान करणाऱ्या ६० टक्के लोकांना 'सीओपीडी'चा त्रास

धूम्रपान करणाऱ्या ५० ते ६० टक्के व्यक्तींना सीओपीडीचा सर्वात त्रास जास्त असल्याचे समोर आले आहे. क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) हा वाढत जाणारा आणि फुफ्फुस अशक्त करणारा आजार आहे. कालांतराने हा आजार गंभीर स्वरुप धारण करतो. या आजारामुळे खोकला येतो, छातीत घरघर होते आणि धाप लागते. सीओपीडीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. त्यात हवेतील प्रदूषण आणि धुळ कारणीभूत असते, असे असले तरी धुम्रपान करणे हे या आजारासाठी कारणीभूत ठरणारे महत्त्वाचे कारण आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, (डब्ल्यूएचओ) २०३० सालापर्यंत तंबाखूमुळे मृत्यू येणाऱ्यांची संख्या ८३ लाख इतकी होणार आहे. तंबाखूचा धूर (सेकंड हँड किंवा पॅसिव्ह स्मोकिंग समाविष्ट) हे सीओपीडीचे प्राथमिक कारण आहे. यात सिगारेट, सिगार आणि पाईप यातून येणारा धूर तसेच सेकंड हँड स्मोकचा समावेश आहे. एखादी व्यक्ती सिगरेट ओढत असताना त्या व्यक्तीच्या आजुबाजूला असलेल्या व्यक्ती सेकंड हँड स्मोकिंग करत असतात. ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे २ (जीएटीएस २) २०१८ नुसार भारतात २३.२४ कोटी व्यक्ती दररोज तंबाखूचे सेवन करतात.

माझ्याकडे येणाऱ्या धुम्रपान करणाऱ्या ५०६०% व्यक्तींना सीओपीडी असतो. त्याचप्रमाणे रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार, चुलीवर काम करणाऱ्या महिलांना सीओपीडी होऊ शकतो. चालताना दम लागणे, धाप लागणे आणि खोकला येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे सीओपीडी असलेल्या धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना पल्मोनरी रिहॅबिलिटेशन करण्याचा सल्ला दिला जातो. यात व्यायाम, आरोग्य प्रशिक्षण आणि श्वसनाच्या तंत्रांचा समावेश असतोडॉ. राजरतन सदावर्ते, कोहिनूर हॉस्पिटलचे छातीविकारतज्ज्ञ

फुफ्फुसाचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असते आणि ते प्रत्येकालाच लागू होते. ते राखण्यासाठी केवळ श्वासाचे व्यायाम उपयोगाचे नाहीत. तंबाखू सोडण्यासाठी औषधांसोबतच सामाजिकभावनिक सहकाऱ्यांचीही आवश्यकता असते डॉ. उर्मिल शहा, ग्लोबल हॉस्पिटलचे फुफ्फुसविकारतज्ज्ञ, परळ

दोन प्रकारचे सीओपीडी असतात. एक असतो ब्रॉन्कायटिस. यात खोकल्याची उबळ येते आणि दुसरा असतो एम्फिसेमा, ज्यात धाप लागते. सीओपीडी विकसित होण्यात काही अनुवांशिक प्रकारही असतात आणि धुम्रपान करणाऱ्या सर्वांनाच सीओपीडी होत नाही. त्याचप्रमाणे सीओपीडीच्या रुग्णांना हायपरटेन्शन आयशेमिक स्ट्रोक, हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग, श्वसनयंत्रणा निकामी होण्याचाही धोका असतो.  – डॉ. अरविंद काटे, झेन मल्टिस्पेशिअॅलिटी हॉस्पिटलमधील फुफ्फुसविकारतज्ज्ञ

 

First Published on: May 30, 2019 11:20 AM
Exit mobile version