घरमुंबई'तंबाखूमुक्त बेस्ट' कर्मचारी; ह्रदयाशी संबंधित आजारांचं प्रमाण झालं कमी

‘तंबाखूमुक्त बेस्ट’ कर्मचारी; ह्रदयाशी संबंधित आजारांचं प्रमाण झालं कमी

Subscribe

बेस्टद्वारे तंबाखू नियंत्रणासाठी सुरू केलेल्या ‘बेस्ट तंबाखू मुक्त’ मोहिमेचा परिणाम आता दिसू लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाअंतर्गत गेल्या ५ वर्षात ह्रदयासंबंधित होणाऱ्या आजारांचं प्रमाण कमी झालं असून त्यावरील होणाऱ्या शस्त्रक्रियांचं प्रमाणही ५१ टक्क्यांनी कमी झालं आहे. सोबतच शेकडो बेस्ट कर्मचाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन बंद केलं आहे.

तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सरसोबत अनेक हृदयाच्यासंबंधीत विकारही जडतात. या कारणातून होणाऱ्या आजारांचं आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंचा आकडा ही इतर आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेत अधिक आहे. यासाठीच बेस्टने बेस्ट कर्मचाऱ्यांना या सर्वापासून दूर ठेवण्यासाठी २०१३-१४ मध्ये ‘बेस्ट तंबाखूमुक्त मोहिम’ कार्यक्रमाची सुरूवात केली.

- Advertisement -

२०१३-१४ मध्ये ९१ बेस्ट कर्मचाऱ्यांची हृदयासंबंधित आजारांवरील शस्त्रक्रिया केली गेली. पण, आता २०१७-१८ मध्ये शस्त्रक्रियांच्या प्रकरणामध्ये ५१ टक्क्यांनी घट झाली असून आता ही संख्या फक्त ४५ एवढी आहे.

बेस्ट आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मोहिमेमुळे गेल्या ५ वर्षांत पाच हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे तंबाखूचे व्यसन सुटले आहे. तंबाखूच्या दुष्परिणांबाबत जागरुकता आणि वेळीच आरोग्यतपासणी करुन केलेले उपचार यामुळे हे प्रमाण घटल्याची माहितीही बेस्ट आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisement -

गेल्या ५ वर्षांची आकडेवारी
वर्ष शस्त्रक्रिया खर्च
२०१३ – १४ ९१ १.२३ करोड रुपये
२०१४ – १५ ९३ ९६ लाख रुपये
२०१५ – १६ ५६ ४६ लाख रुपये
२०१६ – १७ ७९ ८१ लाख रुपये
२०१७ – १८ ४५ ३९ लाख रुपये

गेल्या ५ वर्षात ४० हजार बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जागरुकता करण्यात आली आहे. यासाठी बेस्टचे केवळ १० ते ११ हजार रुपये खर्च झाले आहेत.

मॅजिक मिक्सचा जास्त परिणाम 

बेस्ट कर्मचाऱ्यांना अनेकदा बस चालवताना तोंडात तंबाखू किंवा गुटखा असे पदार्थ चघळण्याची सवय असते. पण, अशामुळे त्यांना त्याची सवय जडून व्यसन लागतं. शिवाय, हे व्यसन सोडलं तरी त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. या समस्येसाठी मॅजिक मिक्स नावाने एक विशेष पावडर तयार केली गेली. ज्यात दालचिनी, बडीशेफ, ओवा, लवंग आणि जिऱ्याचा वापर केला गेला. ही पावडर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिली गेली. ज्याचा परिणाम व्यापक स्वरुपात दिसला असून याद्वारे ५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन सोडण्यास मदत झाली असल्याचं बेस्टचे सीएमओ डॉ. अनिल कुमार सिंघल यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -