महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

तुला बाहेरची बाधा झाली आहे. तुला चेटकीणीने झपाटलय. तुझ्या पतीचे बाहेर संबध आहे. त्यामुळे तुला त्रास होतोय अशा प्रकारची बतावणी करीत भोळया भाबडया महिलांना फसवून त्यांच्याशी अश्लिल चाळे करीत त्यांचा विनयभंग करणाऱ्या भोंदूबाबाला आणि त्याच्या एका महिला साथीदाराला कल्याणच्या खडकपाडा पेालीसांनी बेडया ठेाकल्या आहेत. चंद्रेश नरसी पीर असे या भोंदू बाबाचे नाव आहे. एका महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केल्यानंतर भोंदूबाबाचे बिंग फुटले आहे.

नेमके काय घडले?

कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरातील एका इमारतीत गेल्या काही दिवसांपासून या भोंदू बाबाचा गोरख धंदा सुरू होता. मोहना येथे राहणारी एक महिला आपल्या चुलत बहिणीसोबत पतपेढीच्या कामासंदर्भात याठिकाणी गेली होती. त्यावेळी या भोंदू बाबाने ‘तुझ्यावर चुडेल आहे ती मी काढून देतो, तुझ्या नवऱ्याचे बाहेर संबंध आहेत. तुझ्या घरच्या लोकांचा तुला त्रास आहे’, असे सांगत सिगारेटचा धूर या महिलेच्या चेहऱ्यावर सोडला. त्यानंतर महिलेला सेंट लावण्याच्या बहाण्याने शरिरावर हात फिरवला. त्यानंतर या महिलेकडे पूजेसाठी २५ हजार रुपये मागत याबाबत कोणाला सांगितल्यास मंत्र -तंत्राने तुमचे नुकसान करू अशी धमकीही दिली. मात्र, बाबाचा हा प्रकार पाहून तिला धक्का बसला. त्या महिलेने तडक खडकपाडा पोलीस ठाणे गाठून बाबाचे कारनामे पेालिसांना सांगितले. खडकपाडा पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरात जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी पूजेचे साहित्य, टाचण्या, दिवे आदी साहित्य आढळून आले. तसेच काही नागरिकही आपल्या कौटुंबिक समस्या घेऊन या बाबाकडे आल्याचे पेालिसांच्या निदर्शनास आले. दरम्यान, खडकपाडा पोलिसांनी या बाबाला ताब्यात घेत त्याच्यावर विनयभंगासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट – अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे. रिक्षात किंवा बाहेर वावरताना ज्या व्यक्ती आपल्या समस्यांबाबत चर्चा करीत असत. अशा लोकांना ते हेरून आपल्या जाळयात ओढण्याचे काम बाबा करीत असत. त्यामुळे लोकांनी अशा प्रकारच्या भोंदू बाबांवर अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


हेही वाचा – भोंदूबाबाची नियत फिरली; घेतला भक्ताचा गैरफायदा

हेही वाचा – तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत


 

First Published on: July 16, 2019 7:11 PM
Exit mobile version