घरमुंबईतरुणीचा विनयभंग करणारा अटकेत

तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत

Subscribe

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोन मुलांचा बाप असलेल्या भामट्याने शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय कॉलेजच्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना भिवंडी येथे घडली आहे. याप्रकरणी कॉलेज तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलिसांनी भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून फिरोज उस्मान अंसारी (३०) याला अटक केली आहे.

नेमके काय घडले?

सदर इसम त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरुणीला सतत त्रास देत होता. तसेच तिला रस्त्यात भेटून आणि मोबाईलवर संपर्क करून तू मला आवडतेस, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मी तुझ्याशी लग्न करेन, आपण पळून जाऊ, असे अश्लील बोलून त्यांनी तरुणीचा विनयभंग केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून त्रास सुरु असल्याने अखेर या रोजच्या त्रासाला कंटाळून पीडितीने भोईवाडा पोलीस ठाणे गाठून नराधम फिरोज याच्या विरोधात, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक जे.पी.जाधव यांनी नराधम फिरोज यास अटक केली असून रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास ४ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -