फडणवीस जिथे उभे राहतात ‘लाइन वही सें शुरू होती हैं’ सांगत आशीष शेलार म्हणाले…

फडणवीस जिथे उभे राहतात ‘लाइन वही सें शुरू होती हैं’ सांगत आशीष शेलार म्हणाले…

मुंबई – देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) महाराष्ट्राचे अध्यक्ष असल्यापासून मी त्यांच्यासोबत त्यांच्या नेतृत्वात काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री बनत महाराहाष्ट्राच्या राजकारणाला नवा पट दिला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगची आठवण येते. ‘हम जहाँ खडे होते हैं लाईन वही से शुरु होती है. आणि म्हणूनच देवेंद्रजी तुम्ही जिथे उभे आहात तिथूनच लाईन सुरू झालेली आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी त्यांच्या भाषणात जबरदस्त डायलॉगबाजी केली. देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis)तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बदलला आहेत. आणि कुणाच्या मनात कल्पना नसेल अशा पद्धतीचं महाराष्ट्राच्या राजकारणाचं तुम्ही चित्र बदललं ,जे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. जेवढे कार्यकर्ते आत बसले आहेत त्याहीपेक्षा जास्त कार्यकर्ते सभागृहाबाहेर आहेत त्या सर्वांचेच आभार व्यक्त करतो, असं आशिष शेलार म्हणाले. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात भाजपने आज मेळाव्याचं आयोजन केले होतं. त्यात भाजपचे महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आशिष शेलार संवाद साधत होते.

हे ही वाचा – जळगावात तणाव : दौरा सुरू होण्यापूर्वीच फाडले आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर

काल दिवसभरात दहीहंडीचा उत्सव झाला. सर्व कार्यकर्ते तिथे व्यस्त होते. पण एका नोटीसीवर आज ते सर्व कार्यकर्ते मेळाव्याला आले, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार असं शेलारांनी व्यक्त केलं. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मला मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. मी तिसऱ्यांदा मुंबई भाजप अध्यक्ष बनलो आहे. मला पुन्हा एकदा मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून पुन्हा का जबाबदारी दिली याचा मी विचार करत होतो. त्यावेळी वृत्तपत्रात सुद्धा वेगवगेळे विश्लेषणात्मक लेख आले. पण या सर्व विश्लेषणामागे माझ्या नेतृत्वच नेमकं विश्लेषण काय असेल किंवा काय अर्थ असेल याचा विचार करत असताना मला खरी कारणं उमगली की, पक्षाने आशिष शेलारला अध्यक्ष बनविले नाही, पक्षाने एका व्यक्तीला अध्यक्ष बनविले नाही तर पक्षाने एका विचारला, जागृतीला अध्यक्ष बनविले आहे. म्हणून आज मुंबईच्या अध्यक्षपदी सात रस्त्याच्या कुंभार चाळीत राहणाऱ्या अशा व्यक्तीला बसवलं आहे ज्याला मुंबईतल्या चाळीतील खरी परिस्थिती आणि खरी समस्या माहित असलेल्या एका व्यक्तीला बसवले आहे.

हे ही वाचा – उद्यापासून ठाकरेविरोधी मोहीम; आमच्या नेत्याचा अनादर नको सांगणाऱ्या केसरकरांनीच केला हल्लाबोल

मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या एका चाळकऱ्याला भाजपने मुंबईच्या अध्यक्षपदी बसविले आहे, असे मनोगत आशिष शेलार यांनी व्यक्त केले. मुंबई म्हाडाच्या संक्रमण शिबिरात स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झुंजणारा जो सामान्य माणूस आहे, त्याला भाजपने मुंबईचा अध्यक्ष बनविले आहे, एका मुंबईकराला बसविले आहे. मुंबईतील गावठाण आणि कोळीवाड्यात स्वतःच्या घराची पुनर्बांधणी करण्यासाठी संघर्ष करणारऱ्या एका आगरी कोळी समाजाच्या व्यक्तीला अध्यक्ष म्हणून बसविले आहे. मुंबईच्या झोपडपट्टीत स्वतःच्या घराची पुनर्बांधणी करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या व्यक्तीला बसविले आहे, असं मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार भाजप मेळाव्यात म्हणाले.

मुंबईतील महत्वाच्या सणांसंदर्भात बोलताना आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुबंईत गणेशोत्सव हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच संदर्भांत बोलताना आशिष शेलार म्हणाले, मुंबईतला गणेशोत्सव आणि आमचा लालबागचा राजा सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक वर्ष बसू शकला नाही. त्या गणेश भक्तांची पीडा समजून घेणाऱ्याला मुंबईचा अध्यक्ष म्हणून बसवलं आहे. मुंबईमध्ये साजरा होणार नवरात्रोत्सव आणि दहीहंडीचा उत्सव या उत्सव प्रिय नागरिकांचं स्वप्न पूर्ण कारण्यासाठी झटणाऱ्या एका नागरिकाला मुंबईचा अध्यक्ष म्हणून बसविले आहे.

रोज मुंबईच्या लोकलने प्रवास करताना नागरिकांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं अशा नागरिकाला भाजपने मुंबईचा अध्यक्ष म्हणून बसवले आहे. त्याच बरोबर मुंबईच्या घरात नळ चोवीस तास तर पाणी दोन तास अशी परिस्थिती आहे ते अश्रू गाळून ती समस्या जाणून घेणाऱ्या नागरिकाला अध्यक्ष बनविले आहे. दरम्यान मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस आणि भाजप पुन्हा एकदा मुंबईत पक्षबांधणी करत आहेत. ठिकठिकाणी भेट देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार भाषणात बोलत होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर सुद्धा शेलक्याशब्दांत टोला लगावला.

हे ही वाचा –  सोमालियात हॉटेलवर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला; १० जणांचा मृत्यू

First Published on: August 20, 2022 2:19 PM
Exit mobile version