घरमुंबईसोमालियात सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान, हल्ल्यात १५ नागरिकांचा मृत्यू

सोमालियात सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान, हल्ल्यात १५ नागरिकांचा मृत्यू

Subscribe

सोमालियाची राजधानी असलेल्या मोगादिशू येथील हॉटेल हयातमध्ये सकाळी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. अल-कायदाशी संलग्न असलेल्या अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तब्बल १४ तास हे ऑपरेशन चाललं.(Somalia Al-Qaeda-linked group Al-Shabaab attacks hotel Hayat; 2 car bomb blasts reported)

हॉटेल हयातवरील हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. तसेच, हे बंदूकधारी हयात हॉटेलमध्ये घुसण्याच्या एक मिनिट आधी एका कारमध्ये मोठा स्फोट झाला होता.

- Advertisement -

पोलीस मेजर हसन दाहीर यांनी सांगितले की, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मोगादिशूचे गुप्तचर प्रमुख मुहिद्दीन मोहम्मद यांच्यासह दोन सुरक्षा अधिकारी जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, पहिल्या स्फोटानंतर काही मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. या स्फोटांमुळे सुरक्षा दलाचे काही सदस्य आणि नागरिक जखमी झाले.

अल-कायदाशी संलग्न असलेल्या अल-शबाब गटाने या संपूर्ण घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. सोमालिया सरकारवर दहशतवादी संघटनेचा हा पहिला हल्ला नाही. याआधीही या दहशतवादी संघटनेने अनेक भीषण स्फोट घडवले आहेत. व्यापारी, मौलवी, सरकारी कर्मचारी यांचा हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये समावेश आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -