बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण: NCBचे दोन अधिकारी निलंबित

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण: NCBचे दोन अधिकारी निलंबित

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण: NCBचे दोन अधिकारी निलंबित

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपास दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. यानंतर बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अनेक कलाकारांची नावं समोर आली. तसेच गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबी (NCB) अनेक कलाकारांच्या घरावर छापे टाकत आहेत. आता याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. तपासा दरम्यान संशयास्पद भूमिका आढळल्यामुळे एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

माहितीनुसार, ज्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे, त्यापैकी एक अधिकारी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्षला जामीन मिळाला, यामध्ये त्यांची संशयास्पद भूमिका आढळली होती. ते एनसीबीची भूमिका कोर्टामध्ये ठामपणे मांडू शकले नव्हते. यामुळे भारती सिंह आणि हर्षला जामीन मिळल्यास सोयीस्कर झालं. तसंच जे दुसरे अधिकारी आहेत, त्यांची बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्या प्रकरणात संशयास्पद भूमिका आढळली. त्यामुळे या दोन एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी आता एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे सविस्तर चौकशी करत आहेत. त्याच्या निर्देशानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसंच एनडीपीएस कोर्टामध्ये एनसीबीनं भारती सिंह आणि पती हर्ष यांचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज देखील केला आहे आणि त्याची कस्टडी मागितली असून पुढच्या आठवड्यात याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – CBI, ED सह सर्व सरकारी कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा; सुप्रीम कोर्टाचे आदेश


 

First Published on: December 3, 2020 10:20 AM
Exit mobile version