हिंदुत्वाचा बेसूर आणि भेसूर चेहरा पाहतोय–उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

हिंदुत्वाचा बेसूर आणि भेसूर चेहरा पाहतोय–उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मविआ सरकारमधील नेत्यांवर गंभीर आरोप करत त्यांना सळो की पळो करून सोडण्याचा विडाच भाजप नेत्यांनी उचलला आहेत. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत मशिदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेत हनुमान चालीसाची जनतेला हाक दिली. खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांनीही हनुमान चालीसावरून रणकंदन करत ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्दयावरून आक्रमक झालेल्या भाजपने ठाकरे सरकारची कोंडी केली आहे. यासर्वांचा समाचार आज उद्धव ठाकरेंनी मास्टर सभेतून घेतला. महाराष्ट्र पेटत का नाही,सरकार पडत का नाही याचाच त्रास विरोधकांना होत असून जाणीवपूर्वक महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्ायंनी केला.

मुंबईतील बीकेसी येथील मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येने राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक सभास्थानी पोहचले होते. यात प्रामुख्याने महिला शिवसैनिक आणि मुस्लीम समाजबांधव उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुंबई अहमदाबाद बुलेन ट्रेन ते संयुक्त महाराष्ट्र या मुद्यांवर रोखठोक भूमिक मांडली. तसेच मुंबईचे लचके तोडण्याचा डाव असल्याचा आरोप करत थेट केंद्र सरकारवर लक्ष्य केलं. पंतप्रधानांनी कोरोनावर घेतलेल्या बैठकीचा उल्लेख केला. कोरोनावरील बैठकीत पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचे सांगितले. यावरही त्यांनी भाष्य केलें. तसेच जीएसटी देत नाहीत पण मुंबईतून ओरबाडत आहेत. असा आरोप करत ठाकरेंनी थेट मोदी सरकारला सवाल केला.

तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी २५ वर्ष युतीमध्ये सडल्याचा पुनर्च्चार केला. आज महागाईच्या मुद्दयावर कोणी बोलत नाही. असा टोला हाणत उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या नावावर लोकांना भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा  घणाघात भाजपवर केला.  जम्मूमध्ये कश्मीर पंडीताची हत्या करण्यात आली यावरही ठाकरेंनी केंद्र सरकारला धारेवर घरले. तसेच आमचे हिंदुत्व खरे की खोटे हे सांगणारे हे कोण असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी भाजपकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी ए बी सी टीम असल्याचा आरोप केला. तसेच काँ्गेरसबरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडलेले नाही. हिंदुत्व काय नेसून सोडण्याची गोष्ट आहे का. तुम्ही आम्हाला काँग्रेसकडे ढकललं. आम्ही उघड गेलो. सकाळी गपचूप गेलो नव्हतो. टीनपाटांना सुरक्षा दिली जाते. तुम्ही बााबरी पाडली मग तेव्हा का नाही ासंगितलं आम्ही पाडली म्हणून..तुमचं विकृत हिंदुत्व आम्हांला मान्य नाही. मनोरुग्ण आहेत हे लोक. भगवी टोपी घालून हिंदुत्व दाखवता येत नाही. टोपीखाली असलेल्या मेंदूमध्ये हिंदुत्व असायला हवं. असा हल्लाबोल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर तुटून पडले. यावेळी  अभिनेत्री केतकी चितळेच्या शरद पवारांवरील पोस्टवरही उद्धव ठाकरेंनी खडे बोल सुनावले. नेहमी सौम्य भाषेत बोलणारे उद्धव ठाकरे आज कमालीचे आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. आपल्या भाषणात त्यांनी भाजपविरोधातील सर्वच मुद्द्यांवर रोखठोक मत मांडली.

बुलेट ट्रेनवरही मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनने कोण जाणार असा सवाल करत  कारशेड होण्यासाठी केंद्रात जाऊन बोंबला असे आवाहनच भाजपला केले. तसेच यावेळी  मुंबई मराठी माणसाची असून अडवणूक केंद्रातून केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणाऱ्या औवेसी बंधूवरही टीका केली. पुरातत्व विभाग औरंगजेबाच थडगं बघतय तिथे जाऊन बोंबला असे त्यांनी भाजपला सुनावले. खोटंनाट विकृत राजकारण बंद करा आता तरी सुधारा असा सल्ला देत उद्धव यांनी पंतप्रधान मोदींच्या उज्जवल योजनेचे बारा कसे वाजले हे सांगितले. मोदींनी अन्नधान्य दिल पण शिजवण्याची सोय राहीलेली नाही असे सांगत उद्धव यांनी मोदी सरकारच्या योजनावर टीका केली. तसेच हनुमान चालीसाचा संदर्भ देत ते म्हणाले की हनुमानाचा, रामाचा अपमान करु नका हद्यात राम आणि हातात काम असू द्या. हिंदुत्व घर पेटवण्याासठी नाही तर घऱाची चूल पेटवण्यासाठी आहे. असे सांगत उद्धव यांनी यावेळी भाजपला हिंदुत्व काय हे सांगण्यचाही प्रयत्न केला.

तसेच यावेळी त्ायंनी भोंग्याच्या मुदद्यावरून  नितिशकुमार यांचा उल्लेख केला.  नितिश यांनी तुमच्या भोंग्यात पाणी ओतले. त्यांनी भोंगे प्रकरण चालू दिल नाही. संघमुक्त करायला निघालेले नितिश चालतात का असा सवालही त्ायंनी  केला. तुम्ही तरी हिंदुत्वासाठी काय केलं ते देशाला कळू द्या. असे सांगत उद्वव य़ांनी फडणवीस यांना टोला हाणला. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावरून ठाकरेंनी चिमटा काढला. देवेंद्र बाबरी पाडायला तुम्ही गेला असता तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती. अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली.

कश्मीरात मुफ्तीसोबत गेलात. अशीही आठवण त्यांनी भाजपला करुन दिली.  विश्वास टाकला त्यांनीच केसाने गळा कापला. असे सुनावत ठाकरे यांनी भाजपबरोबरील युतीसंदर्भात वक्तव्य केल.  केजरीवाल तुमच्या राज्याच्या तोडीच काम महाराष्ट्राने केलय. तसेच मुंबई एकमेव महापालिका आहे जी ८ भाषेत शिक्षण देत आहे.याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली.  तसेच कोरोना काळात राज्याने केलेल्या उत्तम कामगिरीची आठवणही त्यांनी यावेळी विरोधकांना करून दिली.

तसेच आता दाऊदच्या मागे लागलेत . उद्या दाऊदही भाजपात मंत्री दिसेल असे म्हणत ठाकरेंनी सध्या मविआच्या मागे लावण्यात आलेल्या सीबीआय, ईडीचा समाचार घेतला.

महाराष्ट्राच पुढे जाणे यांना बघवत नाहीये. असा आरोप करत त्त्यांनी  सोमय्या वरही टीका केली. त्यांना सॉसची बाटली कोणी दिली असा सवाल करत त्यांनी बोबड्याचा ऐकू नका असा सल्लाही जनतेला दिला.  गुंतवणूक आणि इतर क्षेत्रात महाराष्ट्र पुढे जातोय. हे केंद्राला बघवत नाही. आम्ही संयम बाळगतोय म्हणजे नामर्दाची जात नाही. शिंगावर आलात तर अंगावर घेऊ…महाराष्ट्राला बदनाम करण्यचे मोहीम सुरु आहे. राहुल भट्टची हत्या झाली त्याची विचारणा करा. असेही उद्धव यांनी सुनावले.

तसेच आमच्या नादी लागायच नाही…आम्ही सोडणार नाही. यांचे घोटाळेही आता एक ेक करुन बाहेर पडताहेत.केंद्र झेड प्लस सुरक्षा कोणाला देताहेत. असा सवालही त्यांनी केंद्राला केला. यावेळी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. काहींना बाळासाहेब असल्यासारख  वाटतय.अंगावर भगव्या शाली घेऊन फिरताहेत. राज ठाकरे म्हणजे केमिकल लोचाची केस आहे हे सांगताना त्यांनी काहींना मुन्नाभाई एम बी बी एस चित्रपटाचा दाखला दिला.

 

 

First Published on: May 14, 2022 9:39 PM
Exit mobile version