गेट वे ऑफ इंडियाजवळ विसर्जनाला बीपीटीकडून सशर्त परवानगी

गेट वे ऑफ इंडियाजवळ विसर्जनाला बीपीटीकडून सशर्त परवानगी

मागील दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा मुंबई सह राज्यभरात सगळे सण – उत्सव साजरे केले जात आहेत. यावर्षीचा गणेह्स उत्सव देखील जल्लोषात साजरा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी गणेश मूर्तींच्या आगमन सोहळ्यासाठी मुंबई महापालिकेने(bmc) व्यवस्थापन केले होते तर आता गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी सुद्धा मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. अशातच आता गेट वे ऑफ इंडियाजवळ गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबईत पोर्ट ट्रस्टने(bpt) परवानगी दिली आहे. बीपीटीने पालिकेला जरी परवानगी दिली असली तरी त्यासोबतच महापालिकेला अनेक अटी सुद्धा घातल्या आहेत.

हे ही वाचा –  प्रत्येकवेळी राजकीय चर्चा झाल्याच पाहिजेत का? राणेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा सवाल

गणेश मूर्तींच्या विसर्जनाला(ganesh visarajan) बीपीटीने महापालिकेला परवानगी देताना ज्या ठिकाणी विसर्जन केले जाईल त्या परिसराची व समुद्राची सफाई करावी त्याचबरोबर प्रवासी बोटींना त्रास होणार नाही याची काळजीसुद्धा घेण्यात यावी अशा अटी बीपीटीने मुंबई महापालिकेला घातल्या आहेत.

नेमक्या अटी कोणत्या आहेत?

1) पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे आणि साठी मुंबई महापालिकेने विशेष नियमावली सुद्धा तयार करावी.

2) त्याचबरोबर जेट्टीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची घ्येण्यात यावी.

3) गणेश मूर्तींच्या विसर्जनानंतर पाण्यावर तरंगणारे निर्माल्य, मूर्तीचे अवषेश आणि इतर वस्तू यांची रोजच्या रोज स्वच्छता करण्यात यावी.

4) गणपती विसर्जनाबाबत पालिकेने बोटींचे व्यवस्थापन करणाऱ्या लाँच ऑपेरेटर आणि बीपीटी प्राधिकरणाला पूर्वकल्पना देण्यात यावी.

हे ही वाचा – ‘कमळाबाई’ म्हणून शिवसेनेने हिणवताच, ‘पेग्विन सेना म्हणायचे का?’ भाजपाचा सवाल

समुद्र किनाऱ्यावर व्यवस्था

मुंबईतील समुद्र किनारे, तलावांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेने विसर्जनाची तयारी केली आहे. मुबई मधील गिरगाव, दादर , माहीम, जुहूसह चौपाटीसह इतर तलावांच्या ठिकाणी महापालिकेकडून विशेष तयारी करण्यात आणि आहे. त्याचबरोबर विसराजनाच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडूनही विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा – ठाकरेंनी दिलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करा, मुख्यमंत्री शिंदेची राज्यपालांकडे विनंती

 

First Published on: September 3, 2022 1:38 PM
Exit mobile version