घरमहाराष्ट्रप्रत्येकवेळी राजकीय चर्चा झाल्याच पाहिजेत का? राणेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा सवाल

प्रत्येकवेळी राजकीय चर्चा झाल्याच पाहिजेत का? राणेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा सवाल

Subscribe

आम्ही पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत इथवर पोहोचलो आहोत.

सध्या मुंबईसह राज्यभरातच गणेशोत्सव मोठ्या उत्सवात आणि आनंदात साजरा केला जात आहे. राजकीय नेते सुद्धा एकमेकांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी जात आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(cm eknath shinde) यांनी लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे(narayan rane) यांच्या यांच्या जुहूमधील ‘अधिश’ या निवास्थानी जाणून त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी माजी खासदार निलेश राणे सुद्धा उपस्थित होते. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर राणे यांच्या घराबाहेरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या दोन्ही नेत्यांमध्ये त्यांच्या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली यासंदर्भांत माहिती दिली.

हे ही वाचा –  ठाकरेंनी दिलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करा, मुख्यमंत्री शिंदेची राज्यपालांकडे विनंती

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे(cm eknath shinde and narayan rane) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगत आहेत. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली या संदर्भांत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”राणेंसोबत झालेली ही भेट केवळ सदिच्छा भेट होती. मी आज इथे गणपतीच्या दर्शनासाठी आलो आहे आणि भेट झाल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. त्याचबरोबर राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांचे अनुभव सुद्धा सांगितले. शेवटी हे जनतेचं सरकार आहे.

- Advertisement -

सर्वसामान्यांचं सरकार आहे. म्हणूनच सर्वसामान्य जनतेसाठी आणि जनतेच्या हितासाठी काय करता येईल या संदर्भांतसुद्धा चर्चा झाली. त्याच बरोबर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे(anand dighe) यांच्याही आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक वेळी राजकीय राजकीय गोष्टींसंदर्भात बोललं पाहिजे असं काही नाही ना?” असा प्रश्न सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी उपसथित केला. ”आपण काही राजकीय चर्चा केली नाही”. असं मुख्यमंत्री शिंदे यांनी नारायण राणे यांच्या कडे पाहून म्हणले. त्यावर नारायण राणे यांनी सुद्धा ”करत पण नाही” असं उत्तर दिलं.

हे ही वाचा – निदान गणेशोत्सवात तरी खरं बोला, भाजपाच्या बॅनरबाजीवर शिवसेनेचा पलटवार

”आम्ही पूर्वी बाळासाहेब ठाकरे(balasaheb thackeray) यांच्या नेतृत्वाखाली काम करत इथवर पोहोचलो आहोत” असंही शिंदे म्हणले. ”त्याचबरोबर एवढ्या कमी वेळात आम्ही किती निर्णय घेतले आणि ते जनतेच्या हिताचे आहेत ते तुम्ही पाहिली आहेत”. असं शिंदे म्हणले.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(raj thackeray) यांच्या घरी जाऊन त्यांच्याही घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्या भेटीवर सुद्धा सर्वत्र बोललं गेलं.

हे ही वाचा – शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा?

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -