CSMT bridge collapse: स्थानिय महासंघ वाहणार जाहीर श्रद्धांजली

CSMT bridge collapse: स्थानिय महासंघ वाहणार जाहीर श्रद्धांजली

स्थानीय लो.स.महासंघाचे सरचिटणीस खा. अनिल देसाई (फाईल फोटो)

मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणारा पादचारी पुल काल एकाएकी कोसळला. हा अपघात इतका भयंकर होता की त्यामध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला तर, ३४ लोक गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेनंतर सीएसएमटी परिसरातील वाहतूक बदलण्यात आली असून, लोकांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने या भागातील सुरक्षेत विशेष वाढवण्यात आली आहे. याच धर्तीवर मुंबईतील शहर भागातील काही नियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचीही माहिती मिळते आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद घेवून, स्थानीय लो.स.महासंघाच्यावतीने आज आयोजित केलेले शिवराय संचलनही रद्द करण्यात आले आहे. दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संचालन करणं मानवतेला धरुन योग्य नसल्याचं म्हणत, हा पूर्वनियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं समजतंय. मात्र, संचालन रद्द केले गेले असले तर, महासंघाच्यावतीने पूल दुर्घटनेत मरण पावलेल्यांना जाहीर श्रद्धाजंली वाहण्यात येणार आहे.


वाचा: पेंग्विनपेक्षा मुंबईतल्या माणसांची काळजी करा – नितेश राणे


सर्व महासंघाचे पदाधिकारी व संलग्न समितीच्या पदाधिकाऱ्यांना तसंच कार्यकर्त्यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचं आवाहन करण्यात आलं आहे. आज (शुक्रवारी) दुपारी ३ वाजता फोर्ट येथील रिझर्व्ह बँकेजवळच्या अमर बिल्डींग येथे हा जाहीर कार्यक्रम होणार आहे. महासंघाच्या वतीने पूल दुर्घटनेत मृत पावलेल्या मुंबईकरांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात येईल. दरम्यान, या कार्यक्रमात कोणत्याही समितीने ‘वाद्य पथक’ आणू नयेत, असं आवाहन स्थानीय लो.स.महासंघाचे सरचिटणीस खा. अनिल देसाई यांनी केले आहे.


वाचा: चिमुरडीला मागे सोडून… तपेंद्र कायमचे गेले

First Published on: March 15, 2019 9:59 AM
Exit mobile version