कोरोनावरील ४,७०० कोटींच्या खर्चाबाबत ‘ऑडिट रिपोर्ट’ सादर करण्याची मागणी

कोरोनावरील ४,७०० कोटींच्या खर्चाबाबत ‘ऑडिट रिपोर्ट’ सादर करण्याची मागणी

Omicron Sub Variant : भारतात आढळला BA.4 चा पहिला रुग्ण, किती धोकादायक आहे हा व्हेरिएंट?

मुंबई महापालिकेने कोरोनावरील उपाययोजना, औषधोपचार, लसीकरण, खानपानसेवा आदींवर आतापर्यंत ४ हजार ७०० कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र या सर्व खर्चाचा तपशील पालिका प्रशासनाकडून देण्यात येत नाही. त्यामुळे पालिकेने या सर्व खर्चाबाबत संपूर्ण तपशील व “ऑडिट रिपोर्ट” सादर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.
तर, भाजपचे प्रवक्ते व स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी, कोरोनावरील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबाबत पालिकेने ” श्वेतपत्रिका” काढावी, अशी मागणी केली आहे.तर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, पालिका प्रशासनाने, कोरोनावरील सर्व खर्चाबाबत संपूर्ण अहवाल सादर करावा, असे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत.

बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत, बीकेसी जंबो कोविड सेंटर येथे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी औषधोपचार, खानपा अन्य सेवासुविधा यांवर ५२ कोटी व ७७ कोटी रुपये खर्च केल्याबाबतचे दोन प्रस्ताव कारयोत्तर मंजुरीसाठी सादर केले होते. त्यावर भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, कॉंग्रेसचे विरोधी पक्षानेते रवी राजा यांनी, तीव्र आक्षेप घेत सदर प्रस्तावात खर्चाबाबत आकडेवारी दिली असली तरी खर्च कधी, कुठे, कसा, किती केला, कोणकोणत्या कामांसाठी खर्च केला याबाबतची सखोल माहिती देण्यात आलेली नसल्याचे सांगत प्रशासनाला फैलावर घेत जाब विचारण्यात आला. तसेच, पालिकेने त्वरित कोरोनावरील हजारो कोटींच्या खर्चाबाबत सविस्तर माहिती सादर करण्याची मागणी भाजप व कॉंग्रेसकडून करण्यात आली.

पालिकेने मार्च २०२० पासून ते आजपर्यंत किमान ४ हजार ७०० कोटी रुपये खर्च केलेला आहे. मात्र त्याचा तपशील देण्यात आलेला नाही. वास्तविक, पालिकेने ज्या वस्तू, सुविधांसाठी एक रुपया खर्च असताना तेथे दहा रुपये व जेथे दहा रुपये खर्च करणे अपेक्षित होते तेथे शंभर रुपये खर्च केले आहेत. कोविडच्या नावाखाली पालिकेत लूट चालवली आहे. पालिका अधिकारी, डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांची काही हॉटेलमध्ये राहणे, खाणेपिणे यांची सोय करण्यात आली होती, मात्र त्यांची नेमकी संख्या किती, काय रेट होता, कोणत्या सेवासुविधा देण्यात आल्या, किती प्रमाणात देण्यात आल्या, याबाबत तपशीलवार कोणतीच माहिती देण्यात येत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

कोरोनावरील खर्चाबाबत पालिकेने ऑडिट करून त्याचा रिपोर्ट स्थायी समितीला सादर करावा, अशी मागणी आपण स्थायी समिती बैठकित व पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली असल्याचे सांगितले.

कोरोनावरील खर्चाबाबत श्वेतपत्रिका काढा – भाजप

कोरोनावर मार्च २०२० पासून गेल्या वर्षभरात प्रथम २ हजार १०० कोटी रुपये व नंतर आणखीन ४०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. यावर्षीही म्हणजे १ जानेवारी ते २० ऑक्टोबरपर्यंत आणखीन काही कोट्यवधी रुपये खर्चण्यात आले आहेत. मात्र या खर्चाबाबत सखोल माहिती पालिका प्रशासन देत नाही, असा आरोप भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केला असून याप्रकरणी पालिकेने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


हेही वाचा – प्रकल्पबाधितांना पर्यायी घरांऐवजी ५० लाखांपर्यंतच मोबदला

First Published on: October 20, 2021 8:48 PM
Exit mobile version