‘माजी नगरसेवकांचे पालकत्व महापालिकेने घ्यावे’

‘माजी नगरसेवकांचे पालकत्व महापालिकेने घ्यावे’

करोनामुळे मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. एकूण मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ५ हजार ४०० कोटी रुपये आहे. मात्र, दहा दिवस शिल्लक असून अजूनही ४ हजार कोटींचा पल्ला लांब आहे.

शिवसेनेच्या माहिमधील माजी नगरसेविका इंदूमती माणगांवकर यांना वार्धक्याच्या काळात एकाकी जीवन जगतानाच कुटुंबांनी त्यांना चक्क वृध्दाश्रमात दाखल केले. त्या वृध्दाश्रमातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील अनेक वार्धक्याकडे झुकलेल्या आणि एकाकी जीवन जगणार्‍या तसेच आरोग्यावरील खर्च न पेलवणार्‍या माजी नगरसेवकांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा माजी नगरसेवकांचे पालकत्व स्वीकारुन मुंबई महापालिकेने घेऊन त्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, तसेच ज्यांच्याकडे कुटुंबाकडून दुर्लक्ष होते, त्यांची जबाबदारीही महापालिकेने स्वीकारावी, अशी मागणी विद्यमान नगरसवेकांकडून केली जात आहे.

एकाकी जीवन जगण्याची ओढवते वेळ!

मुंबई महापालिकेचे प्रतिनिधित्व करणार्‍या अनेक माजी नगरसेवकांना आर्थिक परिस्थितीमुळे हलाखीचे जीवन जगावे लागत असून उतरत्या वयात त्यांच्या आरोग्यावरील उपचाराचा खर्च त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबांलाही पेलवेनासा होतो.
वयोमानानुसार आरोग्याच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे तसेच कुटुंबाकडून त्यांची योग्य देखभाल केली जात नसल्याने अनेक माजी नगरसेवकांपैकी काही जण एकाकी जीवन जगत आहेत. अशा माजी नगरसेवकांचे पालकत्व मुंबई महापालिकेने घेऊन त्यांच्यावरील वैद्यकीय उपचारावरील तसेच पालनपोषणावरील खर्च करावा. जेणेकरून जीवनातील शेवटच्या काळात दु:खाच्या गर्तेत असलेल्यांना मायेची फुंकर मारता येईल, अशी मागणी काँग्रेस नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.


बेस्टच्या मालमत्तांचा विकास उपक्रमानेच करा; भाजप नगरसेवकाची मागणी

कुटुंबाकडूनच होते दुर्लक्ष

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आजवर अनेक जण नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. अनेक माजी नगरसेवक हे वृध्दापकाळाकडे झुकलेले असून काही माजी नगरसेवक हे विविध आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांची योग्यप्रकारे देखभाल त्यांच्या कुटुंबांकडून केली जात नाही. त्यातच हे माजी नगरसेवक एकटे राहत असल्यास त्यांना अडगळीत पडून राहावे लागते. त्यामुळे अशाप्रकारे ज्या माजी नगरसेवकांना वार्धक्याच्या काळात हाल सोसावे लागतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांचे पालकत्व मुंबई महापालिकेने घ्यावे आणि यासाठी महापौरांच्या अधिकारातील निधीतून पैसा खर्च केला जावा, अशी सूचना सोनम जामसूतकर यांनी केली आहे.

First Published on: December 2, 2019 8:55 PM
Exit mobile version